जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed News: ZP शाळेच्या पोरांना लयभारी संधी, इस्रो आणि नासाची करणार वारी!

Beed News: ZP शाळेच्या पोरांना लयभारी संधी, इस्रो आणि नासाची करणार वारी!

Beed News: ZP शाळेच्या पोरांना लयभारी संधी, इस्रो आणि नासाची करणार वारी!

बीड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी इस्त्रो आणि नासा या संस्थांना भेट देणार आहेत. यासाठी परीक्षेतून प्रत्येक तालुक्यातील तीन विद्यार्थी निवडले जातील.

  • -MIN READ Bid,Bid,Maharashtra
  • Last Updated :

    रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 21 फेब्रुवारी: सध्याच्या आधुनिक युगामध्ये नवनवीन प्रयोग आणि शोध देखील लागत आहेत. याच गोष्टींची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून बीड जिल्ह्यातील विद्यार्थी इस्त्रो (ISRO) आणि नासा (NASA) संस्थांना भेट देणार आहेत. जिल्ह्यातून एकूण 33 विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार असून अनेक विद्यार्थी निवड प्रक्रियेसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या तयारीला देखील लागले आहेत. नियोजन समितीकडून निधी मंजूर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठीही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना संशोधना सह वैज्ञानिक कशाप्रकारे काम करतात? या बाबींची माहिती व्हावी म्हणून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना श्रीहरीकोटा येथील स्पेस सेंटर (इस्त्रो) आणि अमेरिकेतील (नासा) या संशोधन केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार आहे. यासाठी जिल्ह्यातून नियोजन समितीकडून निधी देखील मंजूर झाला आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    किती विद्यार्थी जाणार? नासा आणि इस्रोला जाण्यासाठी बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांतून विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. प्रत्येक तालुक्यातील तीन असे जिल्ह्यातून 33 विद्यार्थी निवडले जाणार आहेत. यातील 11 विद्यार्थ्यांना नासा तर 22 विद्यार्थ्यांना इस्रोला भेटण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना द्यावी लागणार परीक्षा इस्रो व नासा येथे भेट देण्यासाठी जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांची परीक्षेतून निवड होणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी केंद्रस्तरावरून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी 50 प्रश्नांची व दहा गुणांची परीक्षा होणार आहे. प्रत्येक केंद्रातून पाच मुले व पाच मुली अशा दहा जणांची निवड होईल. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांची 3 मार्चला तालुकास्तरावर 100 गुणांची परीक्षा होणार आहे. यात 75 गुणांचे 75 बहुपर्यायी प्रश्न आणि 25 गुणांची निबंध परीक्षा घेण्यात येईल. यातून पाच मुले व पाच मुली निवडण्यात येतील. त्यातच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या गुणानुक्रमाने तीन विद्यार्थी निवडण्यात येतील. यात एक मुलगी असेल. अशा प्रकारे विद्यार्थ्यांची निवड होईल. HSC, SSC Exam : विद्यार्थ्यांनो, परीक्षेचं टेन्शन आलंय? एक कॉल करेल सर्व काळजी दूर! परीक्षेसाठी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना नासा व इस्रो ला भेट देण्यासाठी परीक्षा द्यावी लागेल. परीक्षेसाठी पाचवी ते आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न असतील. यामध्ये एस्ट्रो फिजिक्स, बायो केमेस्ट्री, भौतिकशास्त्र, गणित, पर्यावरण या विषयाचे प्रश्न असतील.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात