बीड, 18 मार्च : अवघ्या आठ वर्षाच्या चिमुकलीला पाच रुपयांच्या पेप्सीचे आमिष दाखवून 40 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना बीड शहारत उघडकीस आली. खेळणारी मुलगी अचानक कुठे गेली म्हणुन तीन तास मुलगी बेपत्ता राहिल्याने आईने तिचा शोध घेतला. आरोपीच्या दारात मुलीची चप्पल दिसल्यानंतर नागरिकांनी पत्रे काढून घरात प्रवेश केला. यावेळी हा नराधम कुकर्म करताना रंगेहात पकडला. याप्रकरणी पेठ बीड पोलिस ठाण्यात पोक्सोसह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खेळण्यासाठी घरातून बाहेर पडली. याचवेळी गल्लीतीलच एका ४० वर्षाच्या नराधमानी पेप्सी साठी पैशे दीले..मुलगी पेप्सी घेऊन येताच तिला आपल्या घरात नेत अत्याचार केला. इकडे मुलीची आई तिचा शोध घेत होती. सर्व गल्ली शोधल्यानंतर ती कोठेही न दिसल्याने तिने रडण्यास सुरुवात केली.
बायको अमेरिकेत अन् मुंबईत कांड, 76 वर्षांचा वृद्ध अडकला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात
याचवेळी आईला मुलीची चप्पल या नराधमाच्या घराबाहेर दिसली. तिने दरवाजा वाजवला; परंतु कोणीही आतून प्रतिसाद दिला नाही. आईने आरडाओरडा केला. त्यामुळे गल्लीतील लोक जमा झाले. घराचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला असता हा नराधम नग्नावस्थेत आढळला.
मुलगीही घाबरलेल्या अवस्थेत रडताना दिसली. नागरिकांनी त्याला चोप दिला. यात तो जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
बुलडाण्यात धक्कादायक प्रकार
चिखलीमध्ये भाजप कार्यकर्त्याला काँग्रेसच्या माजी आमदाराच्या समर्थकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. या मारहाणीत श्याम वाकदकर हे जखमी झाले आहेत. माजी आमदार राहुल बोंद्रे आणि त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. वाकदकर यांनी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं हा प्रकार घडल्याचं म्हटलं जातंय.
भाजप नगरसेवकावर भरदिवसा गोळीबार, डोक्यात दगड घालून केली हत्या, सांगली हादरली
चिखलीत आज सकाळी नागरिकांना तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाला. चिखलीतील श्री शिवाजी विद्यालयासमोर भाजपच्या श्याम वाकदकर यांना काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे आणि त्यांच्या समर्थकांकडून बेदम मारहाण करण्यात आली असल्याचा प्रक्रार घडला. माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे वडीलांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट वाकदकर यांनी फेसबुकवर केली होती, त्यामुळेच हा प्रकार घडलाय. स्वतः राहुल बोंद्रे यांनी सुद्धा या वृत्ताला दुजोरा दिलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.