जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed News : सातासमुद्रापार बीडच्या फळांना मोठी मागणी, शेतकऱ्यांनी कमी पाण्यात करून दाखवला करिष्मा

Beed News : सातासमुद्रापार बीडच्या फळांना मोठी मागणी, शेतकऱ्यांनी कमी पाण्यात करून दाखवला करिष्मा

Beed News : सातासमुद्रापार बीडच्या फळांना मोठी मागणी, शेतकऱ्यांनी कमी पाण्यात करून दाखवला करिष्मा

Beed News : सातासमुद्रापार बीडच्या फळांना मोठी मागणी, शेतकऱ्यांनी कमी पाण्यात करून दाखवला करिष्मा

सीताफळाची शेती कमी पाण्यात आणि कमी खर्चात भरपूर नफा देणारी आहे. त्यामुळे बीडमधील अनेक शेतकरी सीताफळाच्या शेतीकडे वळत आहेत.

  • -MIN READ Bid,Bid,Maharashtra
  • Last Updated :

बीड, 6 जुलै: सध्याच्या काळात अनेक शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळत आहेत. राज्यातील काही ठिकाणं एखाद्या पिकासाठीच ओळखली जातात. सध्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल सीताफळाच्या शेतीकडं वाढला आहे. कोरडवाहू भागातील हलक्या व उथळ जमिनीत पारंपरिक पिकांऐवजी फळझाडांची लागवड आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर आहे. सीताफळाच्या शेतीतून अगदी कमी वेळात अधिक उत्पन्न हाती येत आहे. सीताफळाचा जिल्हा म्हणून बीडची ओळख बीड जिल्हा हा सिताफळाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच जिल्ह्यातील धारूर तालुक्यामधील सीताफळ पर राज्यातच नाही तर परदेशातही विक्रीसाठी जातो. सीताफळ हे हलक्या, मुरमाड जमिनीत चांगल्या प्रकारे वाढणारे आणि अत्यल्प मशागतीत अधिक नफा मिळवून देणारे पीक आहे. या फळपिकाला उष्ण, कोरडे हवामान आणि मध्यम किंवा कमी हिवाळा मानवतो. त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सीताफळाची सर्वाधिक लागवड होऊन उत्पादकता देखील चांगली आहे, असे कृषी अभ्यासक रामेश्वर चांडक सांगतात.

News18लोकमत
News18लोकमत

कशी करतात सीताफळ लागवड? सीताफळाची लागवड ही वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते. 15×7.50, 12×8 किंवा 12×7 अशा पद्धतीने शेतामध्ये सीताफळाची लगवड केली जाते. लागवड करताना दिशेचे भान ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. लागवड ही दक्षिण उत्तर असणे गरजेचे आहे. लागवडीसाठी बालानगरचे वाण सर्वोत्तम आहे. साधारणता लागवडी नंतर अडीच ते तीन वर्षानंतर पहिलं पीक घेणं गरजेचे आहे. पिक घेण्याची गडबड केली तर झाडाची उत्पादकता कमी होते, असे चांडक सांगतात. सीताफळाला लागतं कमी पाणी सीताफळ हे कोरडवाहू फळझाड असल्याने गरजेइतकेच पाणी द्यावे. लागवडीनंतर 3 ते 4 वर्षे झाडाच्या वाढीच्या काळात उन्हाळ्यात पाणी द्यावे.पूर्ण वाढलेल्या झाडास साधारपणे 50 ते 60 लिटर पाणी पुरेसे होते. पाण्याची गरज झाडांचे अंतर आणि स्थानिक हवामानावर अवलंबून असते. सीताफळास सूक्ष्म फळनिर्मिती, फळधारणा आणि फळांच्या वाढीच्या अवस्थेत जून-जुलै ते सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाण्याची गरज असते, असेही कृषी अभ्यासक चांडक सांगतात. शेती न करता कमवा हेक्टरी सव्वा लाख रुपये, शिंदे सरकारची खास योजना, Video सीताफळाच्या प्रमुख जाती सीताफळाच्‍या 40 ते 50 विविध प्रजाती असून 120 जाती आहेत. अधिक उत्‍पादनासाठी अनेक जाती आहेत. बाळानगर ही मोठया फळाची चांगल्‍या गराची (48 टक्‍के ) जात असून आपल्‍या हवामानात आणि जमिनीत चांगली येते. अर्का सहान, अॅनोना हायब्रीड नं. 2 धारूर 3, 6 ऑयलॅड जेम्‍स, पिंक बुलक्‍स हाई, अॅर्टिमोया वॉशिंग्‍टन 10705, वॉशिंग्‍टन 98787 आदी सीताफळाच्या जाती आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात