बीड, 13 नोव्हेंबर : इलेक्ट्रीक बाईक आणि स्कुटरची डिलरशीप देतो असे सांगून एका भामट्याने तब्बल पावणे चार लाखांना गंडवल्याची घटना बीड शहरात उघडकीस आली. या प्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव सुभाषराव कुडके असे फसवणूक झालेल्या व्यक्तीच नावं आहे.
पश्चिम बंगल च्या कोलकाता मधील ब्रिश्वदीप सरकार याने फोन करून तुम्हाला बीएसएस मोटार या कंपनीची इलेक्ट्रीक बाईक आणि स्कुटरची संपुर्ण महाराष्ट्रात डिलरशीप देतो, तसेच तुम्हाला पाच इलेक्ट्रीक मोटारसायकल लागलीच पाठवून देतो, असे म्हणून पैशाची मागणी केली. त्यावेळी महादेव कुडके यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून फोन पे वरून पैसे पाठवले.
हे ही वाचा : पत्नीचा राग काढण्यासाठी पोटच्या मुलीचा घेतला जीव, आत्महत्येचा बनाव रचत केलं भयानक कांड
28 नोव्हेंबर 2021 पासून ते दि. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यांना तब्बल 3 लाख 70 हजार रुपये पाठवूनही डिलरशीप न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महादेव कुडके यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाणे गाठत ब्रिश्वदीप सरकार याच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडमध्ये 24 तासात दोन धक्कादायक घटनांनी खळबळ
बावीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार बीडच्या निपाणी जवळका गावात उघडकीस आला होता. दरम्यान या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नीने झोपलेल्या पतीचा गळा दाबून खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
गेवराई पोलिसात पत्नीविरोधात 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा प्रकार समोर येताच सगळ्यानाच धक्का बसला आहे. नेमकं कोणत्या कारणावरून गळा दाबून खून करण्यात आला याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाही.
हे ही वाचा : नवी मुंबई हादरली, दोन गटात तुफान हाणामारी, एकाचा जागीच मृत्यू
गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका गावातील 22 वर्षीय पांडुरंग राजाभाऊ चव्हाण याचे व शीतल सोबत 14 ऑक्टोबर 2022 रोजी पौळाचीवाडी येथे रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. त्यानंतर नवरदेव मुलगा राजाभाऊ मला आवडत नाही, असे म्हणून शीतल त्याच्यासोबत सतत भांडण करत होती.