जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Agriculture News: लाखोंचं उत्पन्न देणारी चिकूची शेती, पाहा लागवडीचं तंत्र

Agriculture News: लाखोंचं उत्पन्न देणारी चिकूची शेती, पाहा लागवडीचं तंत्र

Agriculture News: लाखोंचं उत्पन्न देणारी चिकूची शेती, पाहा लागवडीचं तंत्र

Agriculture News: लाखोंचं उत्पन्न देणारी चिकूची शेती, पाहा लागवडीचं तंत्र

चिकूची शेती फायद्याची ठरत आहे. त्यासाठी लागवडीचं तंत्र योग्य असण्याची आवश्यकता आहे.

  • -MIN READ Bid,Bid,Maharashtra
  • Last Updated :

बीड, 15 जुलै: महाराष्ट्रामध्ये सध्या पारंपरिक शेतीपेक्षा फळांची शेती फायद्याची ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फळबागांच्या लागवडीकडे कल वाढत आहे. चिकूसारखे फळ सर्वांना आवडते आणि ते सर्व प्रकारच्या वातावरणात येते. त्यामुळे अनेकजण चिकूची बाग लावत आहेत. बाजारात चिकूला मोठी मागणी असल्याने चिकूची बाग आर्थिक फायदा देणारी असल्याचे बीडमधील कृषी तज्ज्ञ रामेश्वर चांडक सांगतात. चिकू लागवडीचे तंत्र अनेकदा चिकूची लागवड करताना बहुतांश शेतकऱ्यांना या लागवडीचे तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन, पाण्याची मात्रा याबाबत योग्य माहिती असणं गरजेचं असतं. तसेच बहर आल्यावर योग्य वेळेत तोडणी अशा अनेक गोष्टी शेतकऱ्यांना माहीत नसतात. चिकूची लागवड केल्यावर भविष्यात येणाऱ्या उत्पन्नावर याचा मोठा फरक पडू शकतो. यामुळे अगदी साध्या पद्धतीने चिकूची लागवड कशी करावी आणि खत, पाणी यांची मात्रा काय असावी याची माहिती घेणे गरजेचं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

चिकूची रोपांची कशी करावी लागवड चिकूची लागवड करताना 10 × 10 अशा पद्धतीने करावी. चिकूचे झाड सदाहरित झाड असून सतत वाढणारे आहे. दाटीच्या लागवडीचे जे आता सूत्र सुरू आहे यामध्ये हे चिकूचे झाड बसत नाही. सदाहरित वर्गातील चिकू पीक हवामान व जमिनीबाबत चोखंदळ नसून अतिथंड प्रदेश वगळता सर्वच ठिकाणी उत्पन्न देऊ शकते. उष्ण व दमट हवामानात चांगली वाढ व उत्पन्न मिळते. जादा चुनखडीचे प्रमाण असणारी व पाणथळ जमीन वगळता सर्वच प्रकारच्या जमिनींमध्ये उत्पन्न चांगले मिळते. चिकू लागवडीच्या जाती कालीपत्ती या जातीच्या झाडाची पाने हिरवी व फळे गोल अंडाकृती असतात. फळाची साल पातळ असून गर गोड असतो. फळे भरपूर लागतात. तर क्रिकेट बॉल फळे मोठी गोलाकार असतात. गर कणीदार असून गोडी मात्र कमी असते. फळे भरपूर लागतात. छत्रीया झाडाच्या फांद्यांची ठेवण छत्रीसारखी असते. पाने फिकट हिरव्या रंगाची असतात. फळाचा आकार कालीपत्तीच्या फळांप्रमाणे असतो. परंतु गोडी कमी असते. मोसंबीची शेती खरंच नफा देते का? कसं करायचं नियोजन? खत व्यवस्थापन पावसाळ्यात झाडांच्या रांगांमधल्या मोकळ्या जमिनीत तागाचा किंवा धैंचाचा बेवड करतात. चिकूच्या एक वर्षाच्या झाडाला अंदाजे 25 किलो शेणखत व अर्धा किलो पेंड देतात. हे प्रमाण दरवर्षी 5 किलो शेणखत व अर्धा किलो पेंड या प्रमाणात वाढवत जावे लागते. दहाव्या वर्षानंतर प्रत्येक झाडाला वर्षाला 75 किलो शेणखत, 8 किलो पेंड आणि अडीच किलो हाडांची भुकटी देतात. चिकूला वर्षातून दोन वेळा फुले-फळे येतात. म्हणून त्याला पावसाळा सुरू होण्यापूर्वी मेमध्ये व पावसाळ्यानंतर डिसेंबरमध्ये असे वर्षातून दोन वेळा खत देतात. पाण्याचे व्यवस्थापन चिकूच्या झाडांना पाण्याचे योग्य व्यवस्थापन गरजेचे असते. हिवाळ्यात 8 व उन्हाळ्यात 5 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. त्यामुळे झाडांची वाढ आणि फळधारणा चांगली होण्यास मदत होते. सातासमुद्रापार बीडच्या फळांना मोठी मागणी, शेतकऱ्यांनी कमी पाण्यात करून दाखवला करिष्मा कीड व रोग नियंत्रण किडीपाने आणि कळ्या खाणारी अळी पानांची जाळी करुन पानांवर उपजीविका करते. तसेच कळ्यांना छिद्र पाडून आतील भाग खाते. नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारी 50 टक्के कार्बारील भुकटी 10 लीटर पाण्यात 20 ग्रॅम मिसळून फवारणी करावी. खोड पोखरणारी अळी साली खालील पेशीवर उपजीविका करते. खोडावरील छिद्रातून बाहेर पडणा-या चोथ्यावरुन या किडीचे अस्तित्व समजते. अळीचा मार्ग शोधून अळीचा नायनाट करावा. कीडग्रस्त फांद्या काढून जाळून टाकाव्यात. खोडावरील / फांद्यावरील छिद्रे केरोसीनमध्ये बुडविलेल्या कापसाच्या बोळ्याने बंद केल्यास अळी गुदमरुन मारणे शक्य होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात