जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : अतिवृष्टीच्या पाहणीदरम्यान कृषी मंत्री अब्दुल सत्तारांची 'दारू पे चर्चा', थेट अधिकाऱ्यांना विचारलं, घेता का?

Video : अतिवृष्टीच्या पाहणीदरम्यान कृषी मंत्री अब्दुल सत्तारांची 'दारू पे चर्चा', थेट अधिकाऱ्यांना विचारलं, घेता का?

Video : अतिवृष्टीच्या पाहणीदरम्यान कृषी मंत्री अब्दुल सत्तारांची 'दारू पे चर्चा', थेट अधिकाऱ्यांना विचारलं, घेता का?

अतिृवृष्टीची पाहणी करायला आल्यानंतर कृषी मंत्री चक्क दारूच्या गप्पा मारत असल्यामुळे बळीराजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा व्हिडीओही तुफान व्हायरल होत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

बीड, 27 ऑक्टोबर : कृषी मंत्री अब्दुल सत्तार सध्या एका वेगळ्याच कारणेवरुन चर्चेत आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानावरुन संताप व्यक्त केला जात आहे. सध्या राज्यभरात ठिकठिकाणी उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. कृषी मंत्र्यानी मात्र अद्याप तशी परिस्थिती नसल्याचं म्हटलं होतं. यावरुन आधीच शेतकऱ्यांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केला जात आहे. अतिृवृष्टीची पाहणी करायला आल्यानंतर कृषी मंत्री चक्क दारूच्या गप्पा मारत असल्यामुळे बळीराजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. कृषी मंत्र्यांनी थेट जिल्हा अधिकारी यांना सर्वांसमोर विचारलं की, दारु घेता का? यावर जिल्हा अधिकाऱ्यांनीही प्रामाणिकपणे कधी कधी थोडी घेतो, असं उत्तर दिलं. जिल्हा अधिकारी राधा विनोद शर्मा आणि कृषी मंत्र्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Abdul Sattar : उद्धव ठाकरे येण्याआधीच अब्दुल सत्तार मध्यरात्रीच पोहोचले शेताच्या बांधावर!

मंत्री महोदय आणि अधिकाऱ्यांना शेतकऱ्याचा दुःखाचा विसर पडला का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. अतिवृष्टीने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या विरोधात बीडमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अतिवृष्टीच्या दौऱ्यानंतर अब्दुल सत्तार यांची जिल्हा अधिकारी राधा विनोद शर्मा यांना दारू पिता का? अशी विचारणा केलेली क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. यावर संताप व्यक्त केला जात आहे.

अतिवृष्ठीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं हाती आलेलं पिक आडवं झालंय. दिवाळी सणाच्या तोंडावरच अस्मानी संकटात उद्धवस्त झालेल्या बळीराजाच्या बांधावर उद्धव ठाकरे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परीषद घेऊन राज्य सरकारकडे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करणार असल्याची माहिती मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: abdul , beed
  • First Published :
जाहिरात
जाहिरात