मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Jalyukt Shivar Yojana : जलयुक्त शिवार योजनेतील पैसै खाल्लेल्या अधिकाऱ्यांवर महसुल विभागाची मोठी कारवाई

Jalyukt Shivar Yojana : जलयुक्त शिवार योजनेतील पैसै खाल्लेल्या अधिकाऱ्यांवर महसुल विभागाची मोठी कारवाई

अधिकारी-कंत्राटदारांच्या मालमत्तेवर महसुली बोजा चढवला जाणार आहे. त्यामूळे अधिकारी आणि गुत्तेदारांची धाबे दणाणले आहेत.

अधिकारी-कंत्राटदारांच्या मालमत्तेवर महसुली बोजा चढवला जाणार आहे. त्यामूळे अधिकारी आणि गुत्तेदारांची धाबे दणाणले आहेत.

अधिकारी-कंत्राटदारांच्या मालमत्तेवर महसुली बोजा चढवला जाणार आहे. त्यामूळे अधिकारी आणि गुत्तेदारांची धाबे दणाणले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

बीड, 03 जानेवारी : बीडच्या परळी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहारातील आरोपी असलेल्या अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांनी वसुलीची 4कोटी रुपयांची रक्कम अद्यापपर्यंत पूर्णतः भरली नाही. त्यामुळे महसूल विभागाने या प्रकरणातील सर्व आरोपींना रक्कम भरण्याच्या नोटिसा काढल्या आहेत. ही रक्कम भरली नाही तर संबंधित अधिकारी-कंत्राटदारांच्या मालमत्तेवर महसुली बोजा चढवला जाणार आहे. त्यामूळे अधिकारी आणि गुत्तेदारांची धाबे दणाणले आहेत.

हे ही वाचा : सार्वजनिकरित्या उत्पन्न सांगू नका, अन्यथा..., शरद पवारांचा शेतकऱ्यांना धोक्याचा इशारा!

2016-17 या वर्षात परळी तालुक्यात जलयुक्त शिवार योजना आरोप करण्यात आला होता यात जलयुक्त शिवार प्रकरणातील आरोपी असलेल्या एकूण 24 अधिकारी, कर्मचारी व 129 कंत्राटदारांना 4 कोटी 83 हजार 347 रुपये भरण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मात्र, चार वर्षांच्या कालावधीत 4 कंत्राटदारांनी केवळ 1 लाख 347 तर 16 अधिकाऱ्यांनी 40 लाख 17 हजार रुपये भरले आहेत. मोठ्या रकमा भरण्याची गती कमी असल्याने त्यांना महसूल विभागाने नोटिसा बजावल्या आहेत.

जलयुक्त शिवार कामातील परळी येथील गैरव्यवहार हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ठरला आहे. सध्या हा ज्लवंत प्रश्न सर्वांचे लक्ष वेधून ठरणारा झाला.

हे ही वाचा : Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या मनात काय? नवीन वर्षाच्या नव्या संकल्पाने चर्चांना उधाण!

जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहार प्रकरणातील परळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील 24 पैकी 16 अधिकारी व कर्मचारी निलंबित झाले होते. तर 7 जण सेवानिवृत्त झाले आहे. तसेच याप्रकरणी सेवेत असणाऱ्या सर्वकर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरु आहे. याशिवाय 129 कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. 

First published:
top videos

    Tags: Beed, Beed news