बीड, 31 ऑक्टोबर : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे कर्जबाजारी झालेले शेतकरी टोकाचं पाऊल उचलतं आहे. बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच; उभं पीक उद्धवस्त झाल्याने एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचं सत्र सुरूच आहे. अतिवृष्टीने उभे पिक उद्ध्वस्त झाल्याने, शेतकरी आत्महत्याकडे वळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रविवारी एकाच दिवशी गेवराई तालुक्यात 2 शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या करत आपलं जीवन संपवलंय. अमोल रानमारे (वय 24 रा. धोंडराई ता. गेवराई) अर्जुन धोत्रे (वय 40 रा. भोगलगाव ता. गेवराईः असं आत्महत्या करुन जीवन संपविलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. तर या दोन्ही शेतकऱ्यांनी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले, यामुळे आत्महत्या केल्याचं समोर आले आहे. (सांगा कसं जगायचं? पिक पाण्यात अन् दुसरीकडे कुटुंब; तरुण शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल) तर, एक दिवसाआधीच अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने पिकाचे नुकसान झाले कुटुंब चालवायचे कसे यावे विवंचनेतून 30 वर्षीय शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड औरंगपूर येथे घडली. नारायण सुंदर पडूळे असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे. अतिवृष्टीमुळे कापसाचे पीक पाण्याखाली गेले बँकेचे कर्ज फेडायचे कसे या नैराश्यातून संबंधित शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितलं. ( गुजरात पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू, तर… ) नारायण पडूळे हे अल्प भूधारक शेतकरी असून, त्यांच्याकडे दोन बँकेचे कर्ज आहे. कर्ज काढून कापसाची लागवड केली होती. मात्र गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हातात तोंडाशी आलेल्या कापसाच्या वाती झाल्या. कापूस पाण्याखाली गेल्यामुळे आता बँकांचे कर्ज फेडायचे कसे? या विवंचनेतून नारायण पडूळे यांनी मृत्यूला कवटाळले. दरम्यान, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याचं अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत शेतकरी संकटात आला. मात्र शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू, असं अनेक मंत्री महोदयांनी सांगितलं. मात्र दिवाळीच्या सणाला शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसानीची दमडीही मिळाली नाही. यामुळं जगावं कसं? या विवंचनेत असलेला शेतकरी आता आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलत आहे. यामुळे राज्य सरकारने आता शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.