जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बारसूमध्ये पुन्हा राडा, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट, घटनास्थळाचा पहिला VIDEO

बारसूमध्ये पुन्हा राडा, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट, घटनास्थळाचा पहिला VIDEO

(बारसू रिफायनरी वाद)

(बारसू रिफायनरी वाद)

आंदोलकांनी सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना अडवण्यासाठी धाव घेतली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.

  • -MIN READ Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

रत्नागिरी, 28 एप्रिल : बारसू रिफायनरीचा मुद्या पुन्हा एकदा पेटला आहे. आज सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या कर्मचारी आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रू धुरांचा मारा केला. आंदोलकांना दूर करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज सुद्धा केला असल्याचे सांगितले आहे. घटनास्थळावर प्रचंड तणावाची परिस्थिती आहे. बारसू सोलगाव पंचक्रोशीत होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला होणारा विरोध आज अधिक तीव्र झाला. भू सर्वेक्षणासाठी विरोध झाल्यानंतर प्रशासनाने आक्रमक होत महिलांसह प्रकल्प विरोधातील महत्त्वाच्या लोकांना अटक केली. त्यानंतर राजापूरमध्ये लोकांमध्ये आणखी राग निर्माण झाला होता. प्रकल्पाबाबत लोकांचे नेतृत्व करणाऱ्यांना अटक केल्यानंतर होणारा विरोध मावळेल अशी आशा असताना आज आंदोलनाला वेगळे वळण लागलं.

जाहिरात

गुरुवारी संध्याकाळी प्रशासन,तज्ञ,प्रकल्प समर्थक आणि विरोधक यांच्या एक संयुक्त बैठक पार पडली,मात्र या बैठकीत शेतकरी आणि मच्छिमारांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात प्रशासन आणि तज्ञांना अपयश आल्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे या प्रकल्पाला असलेला विरोध आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. (‘छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांना शाप देणार’, ‘बारसू’च्या राड्यावरून राऊत मुख्यमंत्र्यांवर संतापले) विशेष म्हणजे, शिवसेनेचे स्थानिक खासदार विनायक राऊत आणि प्रकल्प विरोधी संघटनेचे अशोक वालम यांनी या लढ्यात सक्रिय भाग घेतला आहे. आज सकाळीच पोलिसांनी राऊत यांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आंदोलकांनी सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना अडवण्यासाठी धाव घेतली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. काय आहे प्रकरण? कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी एका बाजूला सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे तर दुसऱ्या बाजूला स्थानिकांकडून प्रकल्पाला विरोध केला जात आहे. या प्रकरणी आतापर्यंत काही जणांना अटकही करण्यात आली आहे. सोमवारी रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना राजापूरमध्ये अटक करण्यात आली. त्यांसोबत आणखी दोन सहकाऱ्यांनाही अटक केली असून तिघांनाही रत्नागिरीत ठेवण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ratnagiri
  • First Published :
जाहिरात
जाहिरात