जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / मेडिकल स्टोअर्सवरच सुरू होता गोरखधंदा; पोलिसांनी धाड टाकून केला रंगाचा बेरंग!

मेडिकल स्टोअर्सवरच सुरू होता गोरखधंदा; पोलिसांनी धाड टाकून केला रंगाचा बेरंग!

मेडिकल स्टोअर्सवरच सुरू होता गोरखधंदा; पोलिसांनी धाड टाकून केला रंगाचा बेरंग!

घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे एका मेडिकलवर क्रिकेट सट्ट्याचा डाव रंगला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

**जालना,17 फेब्रुवारी:**घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे एका मेडिकलवर क्रिकेट सट्ट्याचा डाव रंगला होता. याप्रकरणी विशेष कृती दलाच्या पथकाने धाड टाकून एकाला अटक केली आहे. पोलिसांनी 47,800 रुपये रोख, मोबाइल व जुगार साहित्य असा 57 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेली माहिती अशी की, रांजणीत 20-20 इंग्लंडविरुद्ध साऊथ आफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळला जात असल्याची माहिती विशेष कृती दलाचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी रांजणी येथील आनम मेडिकलवर धाड टाकली. अख्तर अली सैय्यद अली यास सट्टा खेळताना रंगेहात पकडले. त्याच्या ताब्यातून रोख 47,800, मोबाइल व जुगार साहित्य असा 57 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, अख्तर अली याने रोहित सेठ (चिंतामणी ट्रॅव्हल्स, जालना) आणि दीपक सेठ (सेलू) यांच्या सांगण्यावरून सट्टा घेत असल्याची कबुली दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहे. धनंजय मुंडेनी दिले कारवाईचे आदेश दरम्यान, बीड जिल्ह्यातील सामजिक न्याय विभागाच्या इमारतीच्या दुरुस्तीच्या कागदावर कामे दाखवून लाखोंचा निधी हडपल्याचा प्रकार ‘न्यूज 18 लोकमत’ने समोर आणला होता. याप्रकरणाची सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेतली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच ही कामे 2016-17 या वर्षातील आहेत. या बाबतीत योग्य ती चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. बीड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात डागडुजीच्या नावाखाली लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा प्रकार ‘न्यूज 18 लोकमत’ने समोर आणला होता यानंतर दस्तुरखुद्द सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेतली. ही कामे सन 2016- 2017 मधील आहेत, या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे संकेत दिले आहेत. यामुळे सार्वजानिक बांधकाम विभागत कोण कोण कर्मचारी अधिकारी आहेत, हे समोर येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात