बारामती, 20 एप्रिल : मानसिक रुग्ण असलेल्या व्यक्तीने दगडाने ठेचून एका वृद्धाचा खून केल्याची घटना बारामती शहरात घडली आहे .शहरातील कसबा येथे सोपानराव सावळाराम जगताप (वय 70 वर्षे) यांचा रविवारी आरोपी, गणेश मारुती कुंभार याने दगडाने ठेचून जगताप यांचा खून केला आहे.
आरोपी गणेश कुंभार माणसिक रूग्ण असून त्याला पुणे येरवडा येथील मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सहा महिन्यांपूर्वी याला सोडण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली असून काल सायंकाळी त्याने हे कृत्य केलं. बारामती शहर पोलिसांनी अरोपीस अटक केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील करीत आहेत.
दरम्यान, लॉकडाऊन काळात बारामती शहरात होणाऱ्या गुन्ह्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी काही दिवसांपूर्वीच शहरात एका अल्पवयीन युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. युवकाच्या मानेवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला गंभीर जखमी अवस्थेत विहिरीत फेकले. स्थानिक नागरिकांनी वेळीच त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण थोडक्यात बचावले. कैफ सलीम कुरेशी असं जखमी युवकाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती.
हेही वाचा-खेळता खेळताच थांबला आयुष्याचा प्रवास, करंट लागून 3 वर्षीय मुलाचा मृत्यू
बारामती शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना अरोपी अय्युब गुलाम कुरेशी याने फिर्यादी कैफ सलीम कुरेशीवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला होता. आरोपीने कैफ याला शहरातील काटेची विहीरीजवळ नेलं होतं. बाथरूमला जाऊन आलो म्हणून आरोपी थोडा बाजूला गेला. नंतर हळूच येताच कसलाही विचार न करता आरोपीनं त्याच्याजवळ असणाऱ्या धारदार शस्त्राने कैफ याच्या मानेवर सपासप वार केले. एवढं नाही तर कैफ याला गंभीर जखमी अवस्थेत शेजारी असणाऱ्या विहीरीत फेकून दिले होते.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.