खेळता खेळताच थांबला आयुष्याचा प्रवास, करंट लागून 3 वर्षीय मुलाचा मृत्यू

खेळता खेळताच थांबला आयुष्याचा प्रवास, करंट लागून 3 वर्षीय मुलाचा मृत्यू

खेळता-खेळता 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे.

  • Share this:

जालना, 19 एप्रिल : मृत्यू कधी आणि कोठे गाठेल याचा काही नेम नाही. आपलं स्वत:च घर हे सर्वात सुरक्षित मानलं जातं. मात्र याच घरात खेळता-खेळता 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. अंबड तालुक्यातील एकलहेरा येथे पत्र्याच्या घरात करंट उतरल्याने वीजेच्या धक्क्याने एका 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

बबलू महादेव भगत असे या मयत झालेल्या बालकाचे नाव आहे. महादेव भगत हे ऐकलहेरा गावात एका पत्र्याच्या घरात पत्नी व मुलासह राहत होते. सकाळी 9 वाजेच्या दरम्यान अचानक घरातील पत्रामध्ये करंट संचारला. चिमुकल्या बबलूचा खेळता खेळता त्या पत्र्याचा स्पर्श झाला आणि त्याला विजेचा धक्का बसला.

कुटुंबीयांनी तात्काळ त्याला तिर्थपुरी येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. सध्या लॉकडाऊन असल्याने कुटुंबीयाने अवघ्या तासाभरातच त्याचा अंतविधीही आटोपून टाकलं.

हेही वाचा- पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेला ट्रकची भीषण धडक, जागेवरच सोडला जीव

दरम्यान, खेळता खेळता आपला मुलगा गमावल्याने महादेव भगत आणि त्यांच्या पत्नीने हंबरडा फोडला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 19, 2020, 12:50 PM IST

ताज्या बातम्या