मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बंडातात्या नरमले, 'त्या' वक्तव्यावरुन म्हणाले "मी माफी मागायला तयार पण..."

बंडातात्या नरमले, 'त्या' वक्तव्यावरुन म्हणाले "मी माफी मागायला तयार पण..."

राज्य सरकारने वाईन विक्रीच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयावरुन बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले. त्यानंतर आता बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे.

राज्य सरकारने वाईन विक्रीच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयावरुन बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले. त्यानंतर आता बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे.

राज्य सरकारने वाईन विक्रीच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयावरुन बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले. त्यानंतर आता बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे.

पुढे वाचा ...

सातारा, 4 फेब्रुवारी: महाराष्ट्रातील सुपरमार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये वाईन विक्रीला राज्य सरकारने परवानगी (wine sale in supermarket) दिली. या निर्णयावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. भाजपसह अनेकांनी हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं. तर याच निर्णयावर ह. भ. प. बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी नेत्यांवर टीका केली आणि त्यावरुन चांगलाच गदारोळ झाला. नेत्यांची मुलं दारू पितात असं वक्तव्य बंडातात्या यांनी केलं होतं. त्यानंतर आता बंडातात्या कराडकर यांनी आपलं विधान मागे घेत माफी मागितली आहे.

बंडातात्या कराडकर यांनी मागितली माफी

बंडातात्या कराडकर म्हणाले, "समजा ज्यांनी माझ्याविरोधात आक्षेप घेतला आहे त्यांचयासोबत फोनवर बोललो आहे मी. जे वक्तव्य केलं त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागायला तयार आहे. माफी मागायला कमीपणा कसला. तुम्ही कशासाठी विषय वाढवता."

सर्व महाराष्ट्राल माहिती आहे. फक्त आम्ही म्हणालो म्हणजे काय झालं. तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला सर्व माहिती आहे असंही बंडातात्या कराडकर म्हणाले.

वाचा : नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात, ट्रकला धडकल्यानंतर बस उलटली

राष्ट्रवादी काँग्रेसचे जोडोमारो आंदोलन

बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक होत आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बारामती शहरातील भिगवन चौकात बंडातात्या कराडकर यांच्या प्रतिमेला जोडा मारो आंदोलन केले. सातारा येथे बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे, यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं, त्याच्या विरोधात बारामतीत राष्ट्रवादी आक्रमक झाली. कार्यकर्त्यांनी भिगवन चौकामध्ये गुरुवारी हे आंदोलन केले. यावेळी बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.

साताऱ्यात गुन्हा दाखल

दरम्यान या प्रकरणी बंडातात्या कराडकरांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर आंदोलन करणे, कोरोनाचे नियम न पाळता आंदोलन करणे, मास्क बाबत वेगळी चिथावणी देणे या कलमांखाली बंडातात्या कराडकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वादग्रस्त भाषण केल्याचीही सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

काय म्हणाले होते बंडातात्या कराडकर?

राज्यातील नेते आणि त्यांची मुले दारू पितात. काही दारू पिऊन रस्त्यावर पडत असतात याचे पुरावे सुद्धा आहेत. इतकंच नाही तर सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्या बाबतही बंडातात्या कराडकर यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं.

राज्य महिला आयोगाने घेतली गंभीर दखल

बंडातात्या कराडकर यांनी खासदार सुप्रियाताई सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केल आहे, ते अत्यंत संतापजनक आहे. त्यांच्या या वक्त्व्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोचलेला आहे. याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असुन त्याबाबत सातारा पोलीसांनी या वक्तव्याबाबत बंडा तात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करुन याचा अहवाल 48 तासाच्या आत अहवाल आयोगास सादर करावा. तसेच बंडातात्या कराडकर यांनी सात दिवसाच्या आत आपला लेखी खुलासा आयोगास सादर करावा अशा सूचना पोलिसांना दिल्या असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Alcohol, NCP, Sale, Satara, महाराष्ट्र