सातारा, 4 फेब्रुवारी: बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सातारा पोलिसांनी (Satara Police) बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतलं आहे. सकाळीच सातारा पोलीस बंडातात्या कराडकर यांच्या फलटणच्या (Phaltan) पिंपरद येथील मठावर दाखल झाले होते. तेथे बंडातात्या कराडकर यांच्यासोबत काही वेळ पोलिसांनी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं आहे. आता सातारा पोलीस बंडातात्या कराडकर यांना घेऊन पोलीस स्टेशनवर निघाले असून वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात त्यांची चौकशी होईल. बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुण्यात आज आंदोलन करण्यात आले. रुपाली चाकणकर यांनी म्हटलं, बंडातात्या यांचं विधान वादग्रस्त आहे. महिलांचं त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. राज्य महिला आयोगाने सातारा पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना देत 48 तासात माहिती सादर करण्यास सांगितले आहे. माफी मागितली असले तरी असे विधान चुकीचे आहे. वारकरी संप्रदायाला काळिमा लावणारं विधान आहे. बंडातात्या कराडकर यांनी मागितली माफी बंडातात्या कराडकर म्हणाले, “समजा ज्यांनी माझ्याविरोधात आक्षेप घेतला आहे त्यांचयासोबत फोनवर बोललो आहे मी. जे वक्तव्य केलं त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागायला तयार आहे. माफी मागायला कमीपणा कसला. तुम्ही कशासाठी विषय वाढवता.” सर्व महाराष्ट्राल माहिती आहे. फक्त आम्ही म्हणालो म्हणजे काय झालं. तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला सर्व माहिती आहे असंही बंडातात्या कराडकर म्हणाले. वाचा : बंडातात्या नरमले, ‘त्या’ वक्तव्यावरुन म्हणाले “मी माफी मागायला तयार पण…” साताऱ्यात गुन्हा दाखल दरम्यान या प्रकरणी बंडातात्या कराडकरांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर आंदोलन करणे, कोरोनाचे नियम न पाळता आंदोलन करणे, मास्क बाबत वेगळी चिथावणी देणे या कलमांखाली बंडातात्या कराडकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वादग्रस्त भाषण केल्याचीही सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. काय म्हणाले होते बंडातात्या कराडकर? राज्यातील नेते आणि त्यांची मुले दारू पितात. काही दारू पिऊन रस्त्यावर पडत असतात याचे पुरावे सुद्धा आहेत. इतकंच नाही तर सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्या बाबतही बंडातात्या कराडकर यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. राज्य महिला आयोगाने घेतली गंभीर दखल
त्याबाबत सातारा पोलीसांनी या वक्तव्याबाबत बंडा तात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करुन याचा अहवाल 48 तासाच्या आत अहवाल आयोगास सादर करावा. तसेच बंडा तात्या कराडकर यांनी सात दिवसाच्या आत आपला लेखी खुलासा आयोगास सादर करावा@SataraPolice
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 3, 2022
बंडातात्या कराडकर यांनी खासदार सुप्रियाताई सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केल आहे, ते अत्यंत संतापजनक आहे. त्यांच्या या वक्त्व्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोचलेला आहे. याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असुन त्याबाबत सातारा पोलीसांनी या वक्तव्याबाबत बंडा तात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करुन याचा अहवाल 48 तासाच्या आत अहवाल आयोगास सादर करावा. तसेच बंडातात्या कराडकर यांनी सात दिवसाच्या आत आपला लेखी खुलासा आयोगास सादर करावा अशा सूचना पोलिसांना दिल्या असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकरणकर यांनी म्हटलं आहे.