• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • मॉडर्न बेकरी आगीत भस्मसात, अग्नितांडवात बेकरीचे लाखो रुपयांचं नुकसान

मॉडर्न बेकरी आगीत भस्मसात, अग्नितांडवात बेकरीचे लाखो रुपयांचं नुकसान

बेकरीला आग ( Bakery Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत बेकरी पूर्णपणे भस्मसात झाली आहे.

 • Share this:
  सिंधुदुर्ग, 14 ऑक्टोबर: सिंधुदुर्गमध्ये (Sindhudurg) बेकरीला आग ( Bakery Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत बेकरी पूर्णपणे भस्मसात झाली आहे. मळगाव बाजारपेठेतील मॉडर्न बेकरीला आग लागली. या आगीत बेकरीत पूर्णपणे भस्मसात झाली आहे. आज पहाटे ही आगीची घटना घडली आहे. या आगीत बेकरीचं लाखोंचं नुकसान झालं आहे. आज पहाटे चारच्या सुमारास लागलेल्या आगीत बेकरी जळून खाक झाली. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. बेकरीत कोणतेही कर्मचारी नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. हेही वाचा- उदयनराजे भोसलेंच्या आलिशान ताफ्यात नव्या कारची भर, जाणून घ्या किंमत आगीची माहिती मिळताच सावंतवाडी नगरपालिका आणि कुडाळ एमआयडीसी येथील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. अग्निशमन दलानं जवळच्या दुकानांना आग लागण्यापासून वाचवलं आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली याबाबत माहिती समोर आलेली नाही.
  Published by:Pooja Vichare
  First published: