मुंबई, 26 ऑक्टोबर : परतीच्या पाऊस आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते. शेती नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार असल्याची माहिती समोर आली होती. शिंदे-फडणवीस यांच्या या दौऱ्याआधी आदित्य ठाकरेंनी बाजी मारली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे गुरूवारीच मैदानात उतरणार आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासोबत आदित्य ठाकरे पुणे आणि नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात आदित्य ठाकरे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेट देणार आहेत. नाशिकच्या सिन्नर तसंच पुण्यातल्या जुन्नर आणि शिरुरमध्ये आदित्य ठाकरे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधतील. आदित्य ठाकरेंचा दौरा दुपारी 12.00 वाजता सोनारी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक दुपारी 2.00 वाजता वडगांव, आळेफाटा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कै. दशरथ लक्ष्मण केदार यांच्या पत्नी श्रीमती शांताबाई दशरथ केदार यांची भेट. दुपारी 3.15 वाजता मलठण, तालुका शिरूर जिल्हा पुणे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची व भागाची पाहणी तसेच शेतकऱ्यांसोबत संवाद, त्यानंतर पत्रकार परिषद दुपारी 4.00 वाजता वाबळे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे दुपारी ०४.२० मौजे वरुडे, ता शिरूर, जिल्हा पुणे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.