जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 10 वर्षांनी हलला पाळणा; कोरोनाने 6 महिन्यांतच हिरावला आनंद, चिमुकलीचा घेतला जीव

10 वर्षांनी हलला पाळणा; कोरोनाने 6 महिन्यांतच हिरावला आनंद, चिमुकलीचा घेतला जीव

10 वर्षांनी हलला पाळणा; कोरोनाने 6 महिन्यांतच हिरावला आनंद, चिमुकलीचा घेतला जीव

महाराष्ट्राच्या अकोल्यात 6 महिन्यांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू (6 Months old baby died due to corona) झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अकोला, 28 मे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांनाही (Coronvirus kids) मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहेत. अशाच एका चिमुकलीला जन्मानंतर 6 महिन्यांत कोरोनाने गाठलं आणि तिचा जीवही घेतला आहे. विशेष म्हणजे ही चिमुकली म्हणजे त्या कुटुंबात 10 वर्षांनी झालेलं पहिलं मूल होतं. 10 वर्षांनी ज्या घरात पाळणा हलला, त्या कुटुंबाचा आनंद कोरोनाने सहा महिन्यांतच (6 Months old baby died due to corona) हिरावून घेतला आहे. अकोल्यातील (Akola 6 months old baby died) ही मनाला चटका लावणारी अशी घटना आहे. अकोल्यातील खान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 10 वर्षांनी या कुटुंबातील पाळणा हललं. पहिलं बाळ जन्माला आलं. एका गोंडस मुलीचा जन्म झाला. लक्ष्मीच्या रूपात पहिलं बाळ त्यांच्या घरी आलं. संपूर्ण कुटुंब आनंदात होतं. चिमुकली सहा महिन्यांची झाली होती. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार चिमुकली दोन दिवसांपूर्वी ती तापानं फणफणली होती. तिला तिला अकोल्यातील मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आलं. तिथं तिची अँटिजेन टेस्ट करण्यात आली, जी कोरोना पॉझिटिव्ह आली.  चिमुकलीला कोरोना झाल्याचं निदान झालं. हे वाचा -  लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा; पहिल्या कोरोना लशीला हिरवा कंदील चिमुकलीवर उपचार सुरू करण्यात आले. पण तिची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली आहे. शुक्रवारी तिचा मृत्यू झाला. जीएनसीमधील बालरोग तज्ज्ञ डॉ. विनीत वरठे यांनी सांगितलं, 27 मे रोजी या मुलीला खूप ताप आल्याने रुग्णालया दाखल करण्यात आलं होतं. तिची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली. सोबतच तिला जन्मजात हृदयाचा आजारही होती. मुलगी खूपच कमजोर होती. त्यामुळे उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला आहे. हे वाचा -  खळबळजनक! 5 दिवसांत 100 लहान मुलं MIS-C च्या विळख्यात; पालकांनो वेळीच ओळखा लक्षणं मुलीच्या मामाने आज तक शी बोलताना सांगितलं की, “अनेक नवस केल्यानंतर  माझ्या बहिणीला दहा वर्षांनी मुलगी झाली. आम्ही खूप आनंदात होतो. 6-7 महिन्यांपूर्वीच मुलीच्या वडिलांचाही हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर ही मुलगीच माझ्या बहिणीच्या जगण्याचं कारण होती. पण तीसुद्धा आता या जगात राहिली नाही. आमच्या दु:खाचा असा डोंगर कोसळेल आम्हाला असं वाटलंही नव्हतं”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात