Home /News /maharashtra /

तरुण शिवसैनिकांनीच बंडखोर आमदारांचे पिळले कान, खरमरीत पत्रात विचारलं उत्तर

तरुण शिवसैनिकांनीच बंडखोर आमदारांचे पिळले कान, खरमरीत पत्रात विचारलं उत्तर

तुमच्यावर काय अन्याय झाला असा थेट सवाल पदाधिकाऱ्यांनी आमदार साहेबांनाच केला आहे, हे पत्र सध्या व्हायरल होत आहे.

    औरंगाबाद, 23 जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी वर्षा सोडण्यापूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता आणि पुढल्या काही तासात ते कुटुंबासह वर्षातून बाहेर पडले. त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रभरात बंडखोर आमदारांवर राग व्यक्त केला जात आहे. दरम्यान औरंदाबादचे आमदार संजय शिरसाटदेखील गुवाहाटीला शिंदे समर्थकांमध्ये आहे. त्यांना युवा सेना पदाधिकाऱ्यांनी थेट पत्रच पाठवलं आहे. शिवसेनेमुळेत तुम्ही तीन वेळेस आमदार झालात हे विसरू नका. तुमच्यावर काय अन्याय झाला तेच कळत नाही. या भाषणानंतर मोठ्या संख्येने शिवसैनिक (Mumbai Shivsainik On Road) रस्त्यावर उतरले आणि आपल्या नेत्याला पाठिंबा असल्याचं जणू वचनच दिलं. उद्धव ठाकरे आम्ही तुमच्या सोबत आहोत, असंच ते यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगत होते. मुख्यमंत्र्यांच्या भावनिक सादानंतर मुंबईभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिकाने (Politics of Emotions) रस्त्यावर उतरले. त्या सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं. आपल्या नेत्याला दुखवू नका, शिंदे साहेब परत या असं आवाहन यावेळी शिवसैनिक करताना दिसले. आताची राजकीय अपडेट... एकनाथ शिंदेकडून वारंवार भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची मागणी केली जात आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी याला कधीच समर्थन दिलं नाही. दरम्यान ठाकरेंचे निकटवर्तीय संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी आता बंडखोर आमदारांना 24 तासात परत येण्याचं आवाहन केलं आहे. तुम्ही परत या. सरकारमधून बाहेर पडण्याबाबत विचार होईल. तुमचं म्हणणं ऐकून घेऊ. तुमच्या भूमिकेवर विचार करू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांच्या या वक्त्यामुळे (sanjay raut statement) आघाडी सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. यानंतर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त केली, अशी माहिती सूत्रांकडून आली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Aurangabad News, Eknath Shinde, Shivseana

    पुढील बातम्या