जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / औरंगाबाद हादरलं! महिलेवर बलात्कार करून तोच व्हिडिओ केला गावात व्हायरल

औरंगाबाद हादरलं! महिलेवर बलात्कार करून तोच व्हिडिओ केला गावात व्हायरल

औरंगाबाद हादरलं! महिलेवर बलात्कार करून तोच व्हिडिओ केला गावात व्हायरल

गंगापूर तालुक्यातील एका गावात संतापजनक घटना समोर आली आहे.

  • -MIN READ Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 8 डिसेंबर : औरंगाबाद जिल्ह्यात गुन्हेगारी प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून खून, गुंडगिरी आणि चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने औरंगाबादकरांना चांगलाच धसका बसला आहे. दरम्यान यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पैठणमधील नेहरू चौकात भर रस्त्यात महिलेच्या डोक्यात फावडे मारून खून करण्यात आला होती. ही घटना ताजी असतानाच आता औरंगाबाद जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेवर बलात्कार करून तोच व्हिडिओ गावात व्हायरल केल्याची धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिन्ही जणांना अटक करण्यात आली आहे. काय आहे सपूर्ण प्रकरण - गंगापूर तालुक्यातील एका गावात संतापजनक घटना समोर आली आहे. गावातील एकाने दोघांच्या मदतीने विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी बलात्कार करतानाचा व्हिडिओ तयार करून तो गावात व्हायरल केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हेही वाचा -  गुप्तधनासाठी ‘त्या’ला जिवंत जाळलं; जादूटोण्याच्या प्रकारानं औरंगाबाद पुन्हा एकदा हादरलं चारित्र्याचा संशय, भर चौकात पत्नीच्या डोक्यात घातले फावडे - औरंगाबाद जिल्ह्यातील महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पैठणमधील नेहरू चौकात भर रस्त्यात महिलेच्या डोक्यात फावडे मारून खून करण्यात आला आहे. ही घटना सकाळच्या दरम्यान घडली आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बायकोवरील संशयाच्या कारणावरून भर चौकात डोक्यात फावडे मारून हत्या केली आहे. आरोपी पती ज्ञानेश्वर पुंडलिक पोळ असे नाव आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात