अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 11 डिसेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत यातच आता औरंगाबादेत हृदयद्रावक घटना पत्नीची आत्महत्येची माहिती मिळतच पतीनेही जीवन संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण घटना - ही धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील घाटंब्री येथील आहे. याठिकाणी एका जोडप्याचा हृदयद्रावक शेवट झाला. सिल्लोड तालुक्यातील घाटांब्री येथील एका जोडप्याने वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विकास तायडे आणि सपना तायडे असे या दाम्पत्याचे नाव आहे. विकास तायडे आणि सपना तायडे यांचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. पत्नी सपना हिने सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, पती विकास हा कामानिमित्त सिल्लोड शहरात गेला होता. त्याला पत्नीची आत्महत्येची माहिती कळताच त्यानेही एक भयानक निर्णय घेतला. हेही वाचा - मित्रांसोबतची ‘ती’ सेल्फी जीवावर बेतली; जालन्यातील तरुणासोबत धक्कादायक घटना विकासने रस्त्याने येत्या वेळेस अंबईजवळील बोरगाव येथील खेळण्या नदीच्या पुलावर गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी आणि पतीच्या आत्महत्येचे हृदयद्रावक घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या दोघांनी आत्महत्या का केली हे अजून समजू शकले नाही. याप्रकरणी अजिंठा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.