औरंगाबाद, 10 सप्टेंबर : महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासात भाषेचे योगदान मोठे आहे. जुन्या काळातील साहित्य, संस्कृती, इतिहास समजण्यासाठी ती भाषा येणे आवश्यक असते. महाराष्ट्रात तेराव्या शतकापासून ते विसाव्या शतकापर्यंत मोडी लिपी (Modi Script)) लेखनासाठी वापरली जात असते. विशेषत: शिवाजी महाराजांची राज्य लिपी म्हणून मोडीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे हा सर्व कालखंड समजून घेण्यासाठी मोडी लिपी शिकणे आवश्यक आहे. आधुनिक काळात मोडी लिपी मागे पडली असली तरी संपूर्ण नष्ट झालेली नाही. या लिपीच्या संवर्धनाचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत. ऐतिहासिक कालखंडाशी जोडण्यात येणाऱ्या या लिपीच्या कार्यशाळेचे आयोजन औरंगाबादमध्ये (Modi Script Work Shop in Aurangabad)) करण्यात आले आहे. पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या औरंगाबाद शहराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. औरंगाबादकरांनी मोडी लिपी शिकावी म्हणून खास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आला आहे. देवगिरी महाविद्यालयामध्ये 20 ते 30 सप्टेंबर दरम्यान दहा दिवस ही कार्यशाळा होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये म्युझियम आहे. या ठिकाणी मोडी लिपी मध्ये अनेक दस्तावेज आहेत हस्तलिखित आणि ग्रंथ हे देखील विद्यापीठातील ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात देखील शिवकालीन साहित्य आहे. त्यासोबत औरंगाबाद शहरांमध्ये गड किल्ले आहेत यादव काळामध्ये मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहारासाठी मोडी लिपीचा वापर करण्यात आला होता. पण, अनेक नागरिकांना मोडी लिपी माहीत नसल्यामुळे इतिहास समजून घेताना अडचण येतात. त्यांची ही अडचण लक्षात घेऊन ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
VIDEO: औरंगाबादेत विसर्जन मिरवणुकीतही शिंदे विरुद्ध ठाकरे गट; आरतीवरुन राजकीय नाट्य
प्रवेशाचे निकष काय? मोडी लिपीच्या दहा दिवसीय कार्यशाळेसाठी विद्यार्थी आणि शिक्षक देखील सहभागी होऊ शकतात. यासाठी वयाची आठ नाही. शिक्षकांसाठी 600 रुपये तर विद्यार्थ्यांसाठी 300 रुपये फीस आहे. यासाठी तुम्ही 19 सप्टेंबरपर्यंत महाविद्यालयामध्ये नोंदणी करू शकता. मोडी लिपीचा वापर हा इतिहासामध्ये प्रामुख्याने वापरला गेलेला आहे यामुळे आपल्याला इतिहास समजून घ्यायचा असेल किंवा आपल्या पूर्वजांचे मूळ कागदपत्र समजून घ्यायचे असतील तर यासाठी मोडी लिपी महत्त्वाचे आहे. ज्यांना मोडी लिपीचा हा कोर्स करायचे त्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा.
गुगल मॅपवरून साभार कुठे करणार संपर्क? डॉ .समिता जाधव,मराठी विभागप्रमुख ,देवगिरी महाविद्यालय,औरंगाबाद उस्मानपुरा येथील बीड हॉटेलच्या पाठीमागे देवगिरी महाविद्यालय आहे महाविद्यालयाची वेबसाईट आहे.9923199176,9922901623 या क्रमांकावरही संपर्क करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.