औरंगाबाद, 8 ऑक्टोबर : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये पहिल्या दहामध्ये येण्याचे स्वप्न असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छ भारत अभियान यादीत औरंगाबाद शहराचा टक्का घसरला आहे. पूर्वी 22 व्या क्रमांकावर असलेले औरंगाबाद शहर थेट 30 व्या क्रमांकावर गेले असून स्वच्छ भारत अभियानामध्ये 8 टक्क्यांनी घसरण झाली आहे. यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेच्या कारभारावर औरंगाबादकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियानाचा निकाल जाहीर केला. त्यात नेहमीप्रमाणे मध्यप्रदेशातील इंदूर शहराने सहाव्यांदा प्रथम क्रमांक पटकावला. ज्या शहरांची लोकसंख्या दहा लाख किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा शहरांची केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सर्वेक्षण केलं जातं. त्यातील विविध निकषांच्या नुसार शहरांची रँकिंग ठरवली जाते. औरंगाबाद शहरांमध्ये तीन महिन्यापूर्वी स्वच्छ भारत अभियानाची पाहणी करण्यासाठी पथक दाखल झालं होतं. त्यांनी पाच दिवस शहराच्या विविध भागात फिरून सर्वेक्षण केले. दरम्यान या समितीने दिलेल्या अहवालानुसार औरंगाबाद शहराची रँकिंग ठरली. स्वच्छ भारत अभियानाच्या सर्वेक्षणामध्ये देशातील 45 शहरांमध्ये औरंगाबादचा 30 वा क्रमांक आला आहे. गेल्या वर्षी औरंगाबाद शहराचा 22 वा क्रमांक होता. हिंदू-मुस्लीम ऐक्याचा खुलताबादचा उरुस, पैगंबरांच्या पवित्र पोशाखाचे होणार दर्शन, Video का बसला फटका ? देशातील शहरे दुर्गंधी मुक्त करण्यासाठी अनेक वर्षांपासून सरकारचे काम सुरू आहे. यासाठीच केंद्र सरकारने दुर्गंधीमुक्त शहर होण्यासाठी मागेल त्याला स्वच्छतागृह दिले आहेत. यामध्ये औरंगाबादला ओ डीएफएफ प्लस प्लस रँकिंग मिळालं होतं. यंदा मात्र, या रँकिंगमध्ये औरंगाबाद शहराची घसरण झाली असून पीडीएफ प्लस रँकिंग शहराला मिळाला आहे. याचा फटका देखील औरंगाबाद शहराच्या स्वच्छ भारत अभियानाच्या रँकिंगवर पडला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे महानगरपालिकेकडे जी खत निर्मिती यंत्रणा, वीज निर्मिती यंत्रणा आणि गॅस निर्मिती यंत्रणा आहे ती पूर्ण क्षमतेने वापरणे गरजेचे आहे. सध्या यामधील बरीच यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे यांचा फटका हा शहर दुर्गंध होण्यासाठी बसत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याच बरोबर नागरिकांनी देखील शहरामध्ये वावरताना फिरताना रस्तावर कचरा न टाकणे किंवा आपला परिसर कसा स्वच्छ राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असं मत पर्यावरण तज्ज्ञ डॉ.दिलीप यार्दी यांनी व्यक्त केले. ‘ही तर आमच्या कामाची पावती’, चांदणी चौकातील पूल बांधणाऱ्या इंजिनिअरची Exclusive प्रतिक्रिया, Video औरंगाबाद शहरातील तरुणांनी महानगरपालिकेच्या सोबत येऊन स्वच्छ भारत अभियानामध्ये हातभार लावावा. महानगरपालिकेच्या यंत्रणा सोबत मिळून तरुणांनी जर काम केलं तर स्वच्छ औरंगाबाद शहर नक्कीच होईल, अशी प्रतिकिया नागरिक कुणाल विभांडीक यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.