मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

विकत न घेता भाडेतत्वावर वाचा कोणतेही पुस्तक, विद्यार्थ्यांनीच सुरू केलं स्टार्टअप, Video

विकत न घेता भाडेतत्वावर वाचा कोणतेही पुस्तक, विद्यार्थ्यांनीच सुरू केलं स्टार्टअप, Video

या स्टार्टअपच्या माध्यमातून विकत न घेता भाडेतत्त्वावर पुस्तक वाचता येणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

औरंगाबाद, 21 नोव्हेंबर : औरंगाबाद शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेंटली डॉट कॉम स्टार्टअपची सुरुवात केली आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून विकत न घेता भाडेतत्त्वावर पुस्तक वाचता येणार आहे. त्यामुळे या भावी अभियंत्यांनी तयार केलेल्या रेंटली डॉट कॉम स्टार्टअपची औरंगाबाद शहरामध्ये सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

रेंटली डॉट कॉम स्टार्टअप मध्ये सध्या दीडशे पुस्तकांचा समावेश आहे. ज्यामध्ये ग्रंथालयामध्ये असणारे शैक्षणिक पुस्तके, कादंबऱ्या, राजकीय पुस्तके , यासह अवांतर वाचनासाठी असणाऱ्या पुस्तकांचा देखील समावेश आहे. सोबतच या स्टार्टअपसाठी शहरातील काही ग्रंथालयांनी पुस्तके भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रियेसाठी होकार दिला आहे. यामुळे लवकरच त्या ग्रंथालयाची पुस्तके रेंटली डॉट कॉम वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती रेंटली डॉट कॉम स्टार्टअप निर्माता अशित खरात याने दिली आहे.

दुर्मिळ पुस्तकांचा खजिना असलेलं ठिकाण, मुंबईकरांचा शोध इथं संपतो! पाहा Video

तुम्हाला हवे असलेली पुस्तक रेंटली डॉट कॉम वेबसाईटवर उपलब्ध नसतील तर तुम्ही त्या संदर्भात मागणी करू शकता. तुम्हाला हवे असलेले पुस्तक या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलं जाईल, असंही रेंटली डॉट कॉम स्टार्टअप निर्माता अशित खरात याने सांगितलं.

या विद्यार्थ्यांनी तयार केले स्टार्टअप

या स्टार्टअपची निर्मिती प्रथमेश देवकर, अशित खरात, निखिल नरवडे, अंकिता मुळे, आकांक्षा हुलगे, सर्वेश देशमुख, श्रुती कोतवाड, चेतना कोडते आणि शिवानी ईटोळीकर यांनी केली आहे.

Video: वडापाव अनेक वेळा खाल्ला असेल, पण स्पेशल चटणीचा पाव वडा खाल्लाय?

अशी करा पुस्तकाची ऑर्डर

तुम्हाला जर या वेबसाईट वरून पुस्तक भाडेतत्त्वावर मागवायचे असेल तर तुम्हाला गुगल क्रोम वरती वेबसाईट वरती जावं लागेल. त्यानंतर लॉगिन प्रोसेस करून 200 रुपये डिपॉझिट द्यावे लागणार आहे आणि त्यानंतर पुस्तक भाडेतत्त्वावर घेण्यासाठी 70 रुपये द्यावे लागणार आहेत. यातील डिपॉझिट हे तुम्हाला परत दिले जाते.

वेबसाईट: Rentlee.in

संपर्क: +91 77579 29478

First published:

Tags: Aurangabad News, Local18