मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video: वडापाव अनेक वेळा खाल्ला असेल, पण स्पेशल चटणीचा पाव वडा खाल्लाय?

Video: वडापाव अनेक वेळा खाल्ला असेल, पण स्पेशल चटणीचा पाव वडा खाल्लाय?

तुम्ही वडापाव अनेक वेळा खाल्ला असेल,मात्र स्पेशल चटणीचा पाव वडा कधी खाल्लाय का?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India

औरंगाबाद, 18 नोव्हेंबर : मुंबईकरांच्या वेगवान जीवनशैलीला साजेसा असा वडापाव आता संपूर्ण महराष्ट्राचा आवडता पदार्थ आहे. महाराष्ट्राच्या बाहेर देशातील प्रमुख शहरांमध्ये आणि अगदी विदेशातही तो आता मिळतो. वडापावच्या आता अनेक फ्रँचायझी देखील निघाल्या आहेत. थोडक्यात वडापाव आता मराठी माणसासाठी अनोळखी राहिलेला नाही. पण पाव वडा या पदार्थाचं नाव तुम्ही अगदी क्वचितच ऐकलं असेल. औरंगाबाद शहरातल्या सिडको परिसरातल्या मातेश्वरी चाट भांडारात मिळणारा हा पाव वडा गेल्या 40 वर्षांपासून औरंगाबादकरांचा लाडका पदार्थ आहे.

वडापाव हा लोकप्रिय पदार्थ असला तरी सगळीकडे तो एकाच पद्धतीनं केला जातो. त्यामुळे त्याच्या चवीचा ग्राहकांना कंटाळा येऊ शकतो. ग्राहकांची ही मानसिकता लक्षात घेऊन मातेश्वरी चाट भंडारचे मालक नानालालजी यांनी वडापावच्या चवीला पर्याय म्हणून पाव वडा तयार केला.

स्ट्रीट फूडला गावरान तडका.. स्पेशल तवा टोस्टची कोल्हापुरात चर्चा! Video

कसा बनतो पाव वडा?

 मातेश्वरी चाट भांडारात पाव वडा करण्याची विशेष पद्धत आहे. यावेळी अगोदर पाव पीठात मिसळून तो तेलात तळून त्यानंतर त्याला कट करून त्यामध्ये चटणी टाकली जाते. पाव वड्यासोबत गोड आणि तिखट चटणीसह दही देखील टाकलं जातं.

हिवाळ्यात खा आमरस, औरंगाबादमध्ये नोव्हेंबर महिन्यात मिळतोय आंबा!

गुगल मॅपवरून साभार

कुठे मिळतो पाव वडा?

तुम्हाला हा स्पेशल पद्धतीनं तयार केलेला पाव वडा खायचा असेल तर तो  तुम्हाला औरंगाबाद शहरातील सिडको भागामध्ये असलेल्या पॅरामिडच्या चौकामध्ये मिळेल. या पाव वड्याची किंमत 20 रुपये आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : नरेंद्र तेली - 9028434994

First published:

Tags: Aurangabad, Local18, Local18 food