जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Asaduddin Owaisi म्हणाले, मला मृत्यूनंतर औरंगाबादमध्ये दफन करा, शिवसेना म्हणते, ते स्वत:ला औरंगजेब समजतात

Asaduddin Owaisi म्हणाले, मला मृत्यूनंतर औरंगाबादमध्ये दफन करा, शिवसेना म्हणते, ते स्वत:ला औरंगजेब समजतात

Asaduddin Owaisi म्हणाले, मला मृत्यूनंतर औरंगाबादमध्ये दफन करा, शिवसेना म्हणते, ते स्वत:ला औरंगजेब समजतात

Asaduddin Owaisi: “मी मृत्यूला घाबरत नाही. माझ्या मृत्यूनंतर मला औरंगाबदमध्ये दफन करा, असं मी आधीच सांगितलंय”, असं ओवेसी लोकसभेत म्हणाले. त्यांच्या या विधानावर शिवसेनेने टीका केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

औरंगाबाद, 5 फेब्रुवारी: एमआयएएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या गाडीवर दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील (UP) एका टोल नाक्यावर गोळीबार झाला होता. या गोळीबाराबद्दल ओवेसी यांनी काल (4 फेब्रुवारी) लोकसभेत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी “मी मृत्यूला घाबरत नाही. माझ्या मृत्यूनंतर मला औरंगाबदमध्ये (Aurangabad) दफन करा, असं मी आधीच सांगितलंय”, असं मत मांडलं. त्यांच्या याच विधानावरुन शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी ओवेसींवर टीका केली आहे. विशेष म्हणजे यावेळी दानवे यांनी औरंगजेबचा उल्लेख करत निशाणा साधला. औरंगजेबला औरंगाबादमध्ये दफन करण्यात आलं होतं. ओवेसीदेखील स्वत:ला औरंगजेब म्हणत आहेत. ते औरंगजेबचे पुरस्कर्ते आहेत, असा दावा दानवे यांनी केली आहे. याबाबतचं वृत्त ‘इसकाळ’ने दिलं आहे. अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले? “औरंबादला औरंगजेबला दफन करण्यात आले आहे. मृत्यूनंतर मला औरंगाबादमध्ये दफन करा, असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले होते. ते स्वतःला औरंगजेब समजतात. खऱ्या अर्थाने त्यांचे खरे दात समोर आले आहे. औरंगजेब आक्रमक होता. त्याने या देशाला लुटले, येथील जनतेला लुटले, देवा धर्माचे नुकसान केले, साधू संतांचे नुकसान केले. ओवेसी यांनी स्वतःला औरंगजेबाचे पुरस्कर्ते नव्हे तर त्याची औलाद असल्याचे स्वतःच्या तोंडून सिद्ध केलंय”, असा घणाघात अंबादास दानवे यांनी केलं आहे. ओवेसी नेमकं काय म्हणाले होते? “मी खूप जवळून, अगदी सहा फुटाच्या अंतरावरुन गोळ्या झाडताना बघितल्या. अध्यक्ष महोदय, मला कृपया बोलू द्या. कदाचित मी उद्याचा दिवस बघणार नाही. मी इथे नाही बोलणार तर कुठे बोलणार? मी विनंती करतो की, तुम्ही हरिद्वार, रायपूर, प्रयागराजमध्ये माझ्याबद्दल काय बोललं गेलं ते बघा. NIV च्या रिपोर्टमध्ये सारं आहे. तुम्ही (सरकार) का लपवताय ते? मी मृत्यूला घाबरनार नाही. आपल्या सगळ्यांना एक ना एक दिवस या दुनियेतून जायचंच आहे. मी तर म्हटलंय, मी या वतनमध्ये जन्म घेतलाय, माझ्या आईच्या उदरात जन्म घेतलाय, जेव्हा माजे डोळे मिटणार तेव्हा औरंगाबादच्या जमिनीत मला दफन केलं जावं”, असं असदुद्दीन ओवेसी लोकसभेत काल म्हणाले होते. ( डॉक्टर होण्याचं स्वप्न हवेत विरलं; औरंगाबादेत 12 वीच्या मुलीचा हृदयद्रावक शेवट ) “मी 1994 सालापासून राजकारणात आहे. मला स्वातंत्र्य आयुष्य जगायचं आहे. मला घुसमटीने जगता येत नाही. मला जिवंत राहायचंय तर माझा आवाज उठवायचा आहे. मला जिवंत राहायचं आहे तर सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोलायचं आहे. मला जर गोळी लागली तर मान्य आहे. पण मी घुसमटीतलं आयुष्य जगू शकत नाही. देशाचे गरीब वाचले तर ओवेसीचा जीव वाचेल. या द्वेषाला संपवा. मला z कॅटेगिरीची सेक्युरीटी नकोय. जेव्हा पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रश्न आला तेव्हा मी बोललो. ते योग्य नाही झालं. उत्तर प्रदेशची जनाता गोडी चालवणाऱ्यांना मतपत्रिकेतून उत्तर देईल. द्वेषाला उत्तर प्रेमाने देईल. कमजोरांना दबवण्याचं उत्तर हिस्सेदारीने देईल”, असंदेखील ओवेसी लोकसभेत म्हणाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात