अविनाश कानडजे, प्रतिनिधी
औरंगाबाद, 27 नोव्हेंबर : राज्यात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यातून हत्या, आत्महत्येच्याही घटना समोर येत आहेत. यातच आता औरगाबादमधूनही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मानलेल्या मामाने 22 वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
ही संतापजनक घटना गंगापूर तालुक्यातील पोलीस ठाणे शिल्लेगाव येथे घडली. या घटनेनंतर आरोपी रामहरी भागण चिकने (वय 35, रा. दायगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच याप्रकरणी आरोपी रामहरी भागण चिकने याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संतापजनक प्रकार 24 नोव्हेंबरला घडला आहे. यानंतर तो 26 नोव्हेंबरला उघडकीस आला.
या घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळाला पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे व त्यांची टीमने भेट दिली. यानंतर आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयातून मित्राला संपवलं -
पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयातून मित्रानेच मित्राला संपवलं असल्याचं समोर आलं आहे. औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये खुनाचा हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत दोन जिवलग मित्र एका हॉटेलमध्ये सोबत दारू प्यायले यानंतर ते सोबतच घरी गेले. इथपर्यंत सगळं अगदी व्यवस्थित सुरू होतं. मात्र, पुढे जे काही घडलं ते अतिशय भयानक होतं.
हॉटेलमध्ये सोबत दारू प्यायल्यानंतर ते घरी गेले आणि सोबतच जेवणही केलं. त्यानंतर यातील एका मित्राने पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयातून मित्राच्या डोक्यात लोखंडी टॉमी घालून त्याची हत्या केली. फारुख खान इब्राहिम खान पठाण असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणात हत्या करणाऱ्या राजपूत पती-पत्नीला सिल्लोड पोलिसांनी घटनेनंतर 2 तासात अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad News, Crime news, Sexual assault, Sexual harassment