जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad Girl Death : बाबांसोबत जेवणं केलं, बादलीजवळ गेली अन्; औरंगाबादमध्ये श्रेयाच्या मृत्यूने गाव हादरलं!

Aurangabad Girl Death : बाबांसोबत जेवणं केलं, बादलीजवळ गेली अन्; औरंगाबादमध्ये श्रेयाच्या मृत्यूने गाव हादरलं!

Aurangabad Girl Death : बाबांसोबत जेवणं केलं, बादलीजवळ गेली अन्; औरंगाबादमध्ये श्रेयाच्या मृत्यूने गाव हादरलं!

औरंगाबामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वॉश बेसीनला हात धुवायला गेलेल्या 4 वर्षीय चिमुकली हीटर लावलेल्या बादलीत पडली.

  • -MIN READ Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे (औरंगाबाद), 25 नोव्हेंबर : औरंगाबामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  वॉश बेसीनला हात धुवायला गेलेल्या 4 वर्षीय चिमुकली हीटर लावलेल्या बादलीत पडली. यामध्ये ती गंभीर भाजलेल्या अवस्थेत असल्याने आज (दि. 25) शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. श्रेया राजेश शिंदे (4, रा.साईनगर, कमळापूर) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात

मिळालेल्या माहितीनुसार, वडील राजेश शिंदे हे दुपारच्या सुमारास घरी आले आणि अंघोळीसाठी बकेटमध्ये पाणी ठेवले होते. यादरम्यान 4 वर्षीय श्रेयाने आपल्या वडिलासोबत जेवण केले आणि वडिलांनी लावलेल्या गरम पाण्याजवळ नळावर हात धुण्यासाठी गेली. यावेळी तिचा हीटर लावलेल्या बादलीमध्ये तोल गेला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली.

हे ही वाचा :  पत्नीचा मृतदेह घेऊन जाताना पोतं फाटलं आणि हात पडला बाहेर, 26 दिवसांआधीच केलं होतं लग्न

दरम्यान वडिलांनी तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु विजेचा शॉक लागून वडीलही फेकले गेले. त्यानंतर त्यांनी हीटरचे बटन बंद करून श्रेयाला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र गंभीर गंभीरपणे भाजलेल्या श्रेयाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयस्पर्शी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राजेश शिंदे हे पत्नी सीमा, मुलगा साई (७), मुलगी श्रेया (४), आई-वडिलांसह कमळापूर येथे साईनगरात वास्तव्यास आहेत.

जाहिरात

नाशिकमध्येही धक्कादायक घटना

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बाथरूममध्ये अंघोळीसाठी काढून ठेवलेले गरम पाणी अंगावर सांडल्याने अवघ्या दहा महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. नाशिकच्या गंगापूर नाका भागात घटना घडली असून या दुर्दैवी घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आवेरा शुभम इंगळे असे मृत बलिकेचे नाव आहे.

हे ही वाचा :  घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला पण निर्णय चुकला; प्रेमानेच घेतला 19 वर्षीय तरुणीचा जीव

जाहिरात

मिळालेल्या माहितीनुसार आंघोळीसाठी तापवलेले पाणी अंगावर पडल्याने 10 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना जुना गंगापूर नाका येथील राठी आमराई परिसरात घडली. आवेरा शुभम इंगळे असे या चिमुकलीचे नाव आहे. आवेराच्या अंगावर पाणी सांडल्यानंतर ती गंभीर रित्या भाजली होती तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात