Home /News /maharashtra /

आता सत्ता परिवर्तनाची लढाई नाही तर..., फडणवीसांचा सेनेला थेट इशारा

आता सत्ता परिवर्तनाची लढाई नाही तर..., फडणवीसांचा सेनेला थेट इशारा

 2013 मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. त्यावेळी आम्ही सत्ता परिवर्तन करणार असं सांगितलं होतं आणि तेच झालं. पण आता

2013 मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. त्यावेळी आम्ही सत्ता परिवर्तन करणार असं सांगितलं होतं आणि तेच झालं. पण आता

2013 मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. त्यावेळी आम्ही सत्ता परिवर्तन करणार असं सांगितलं होतं आणि तेच झालं. पण आता

    औरंगाबाद, 23 मे : '2013 मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. त्यावेळी आम्ही सत्ता परिवर्तन करणार असं सांगितलं होतं आणि तेच झालं. पण आता सत्ता परिवर्तन करण्याची लढाई नाही तर व्यवस्था परिवर्तन करण्याची लढाई आहे' असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला. औरंगाबाद पाणी प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. पैठण गेटवरून सुरू झालेला मोर्चा हा पालिकेसमोर मोठ्या सभेत पार पडला यावेळी फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. संभाजीनगरच्या इतिहासातला अभुतपूर्व मोर्चा असेल. 2013 मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. त्यावेळी आम्ही सत्ता परिवर्तन करणार असं सांगितलं होतं आणि तेच झालं. पण आता सत्ता परिवर्तन करण्याची लढाई नाही तर व्यवस्था परिवर्तन करण्याची लढाई आहे. हा मोर्चा भाजप पक्षाचा नाही. हा मोर्चा जनतेच्या आक्रोश आहे. संभाजीनगरमध्ये जुम्मे के जुम्मे पाणी येत आहे. थेंब थेंब पाण्यासाठी लोक परेशान असतील तर आम्ही शांत बसणार नाही. आम्ही संघर्ष जेव्हाच संपेल, जेव्हा संभाजीनगरमध्ये पाणी येणार नाही, तोपर्यंत तुम्हाला शांत बसू देणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. 'माझ्या या मोर्चाला परवानगी देताना किती अटी टाकल्यात. इकडे मोर्चा काढायच्या नाही, तिकडे स्टेज उभारयचा नाही. हा जनतेचा आक्रोश आहे, त्याला तुम्ही रोखू शकत नाही. आमचे कार्यकर्ते शिवसेनेचे पोस्टर फाडत होते, तुम्ही यांचा आक्रोश फाडू शकत नाही. नळातून वाफा येत आहे. आज तर आमची एक 80 वर्षांची आजी हंडा घेऊन मोर्च्यामध्ये होती. हंडा घेऊन होती, झुकेंगा नाही म्हणणाऱ्या 80 वर्षांच्या आजीच्या घरात गेला होता. मग मुख्यमंत्री महोदय, हंडा घेऊन चालणाऱ्या या 80 वर्षांच्या आजींच्या घरात कधी जाणार आहात,  हा आक्रोश तुम्हाला कधी समजणार, असा सवालच फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला. आमच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं, तर ते ऐकतच नाही. त्यांनी औरंगाबादचं नामांतर करण्याची गरजच काय म्हणताय, मी संभाजीनगर म्हटलं तर संभाजीनगर समजा. जर त्यांच्याकडे पाण्याचा प्रश्न घेऊन गेलो तर ते नळातून येणाऱ्या वाफेला पाणी समजा असंच म्हणतील, म्हणजे, दगडाला नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या वाफेला पाणी समजा, असंच म्हणतील, असा टोलाही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. 'मी तर मुख्यमंत्री झाल्यानंतर समांतर जलवाहिनीचा 4 वेळा बैठक घेतल्या. नुसते पैसे खालले. मी आयुक्तांना फोन केला आणि विचारलं काय चाललं आहे तिथे, तर प्लास्टिक पाईप बदलण्याचा निर्णय घेतला, लोखंडाचे पाईप काढले आहे. कोणताही करार आणि टेंडर न काढल्याशिवाय काम सुरू केले. शेवटी दोन अडीच वर्ष पाहिले, तेव्हा राजाचा पोपट मेला तसा समांत्तर जलवाहिनीचा पोपट इथं मेला आहे, अशी टीकाही फडणवीसांनी केली. 'माननिय बाळासाहेब ठाकरे यांचं संभाजीनगरवर प्रेम होतं, पण या लोकांना मुंबई आणि एमएमआरडी वगळता महाराष्ट्र दिसत नाही. औरंगाबाद हे महाराष्ट्रात आहे की नाही, हे त्यांना माहितीच नाही. औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी आहे, हे त्यांना माहितीच नाही. ज्या गतीने काम सुरू आहे, जो जो जनतेच्या विरोधात जाईल, त्याला जनता खाली घेऊन राहिल. ही पालिका भ्रष्टाचाराचा अड्डा आहे. दोन वर्ष या लोक भांडत होते, हे सव्वाशे कोटी खर्च करा असं सांगितलं, पण टक्केवारीवरूनच यांची भांडणं सुरू होती. जे भेटलं ते आमच्या सरकारच्या काळात भेटलं', अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या