जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / National Science Day 2023: मधुमेह रुग्णांची होणार इंजेक्शनच्या त्रासातून सुटका, पाहा Video

National Science Day 2023: मधुमेह रुग्णांची होणार इंजेक्शनच्या त्रासातून सुटका, पाहा Video

National Science Day 2023: मधुमेह रुग्णांची होणार इंजेक्शनच्या त्रासातून सुटका, पाहा Video

National Science Day 2023 : छत्रपती संभाजी नगरमधील संशोधकांनी मधुमेहावर एक महत्त्वाचं संशोधन केलं आहे.

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

    सुशील राऊत, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 28 फेब्रुवारी :  विज्ञानाच्या जोरावर अनेक दुर्धर आजारांवर आपल्याला मात करता आली आहे. यामधील एक गंभीर आजार म्हणजे मधुमेह. बदलत्या जीवनशैलीत मधुमेह हा वेगानं पसरणारा आजार बनलाय. या आजाराबद्दल अनेकांच्या मनात भीती आणि गैरसमज आहेत.  छत्रपती संभाजी नगरमधील संशोधक डॉ. संगीता डोंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून या विषयावर एक मोठं संशोधन केलं आहे. त्याचा या रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. काय आहे संशोधन? औरंगाबादच्या डॉ. संगिता डोंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मधुमेहावर ‘इन्सुलिन इंजेक्शन डिव्हाईस’ बनवलं आहे. त्यामुळे रुग्णांना वारंवार सुई टोचल्यामुळे होणारा त्रास कमी होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. भारत हा मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत जगात दुसरा देश आहे सरासरी सात कोटी सत्तर लाख मधुमेही भारतात असून यामध्ये 1.2 कोटी रुग्ण हे 65 वयोगटातील आहेत. सध्याची परिस्थिती पाहता भारतामध्ये या रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. मधुमेह या आजाराच्या रुग्णांच्या आकडेवारी आणि  कारणांचा शोध घेतल्यास अनेक रुग्णांच्या मृत्यूस मधुमेह हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कारणीभूत ठरताना दिसून येतो. मधुमेह साखरेचा आजार हा गोड गैरसमज! पाहा काय आहे खरं कारण, Video देशामध्ये वाढत असलेल्या या मधुमेहासारख्या आजारावरती आपण काहीतरी पर्याय काढावा ही संकल्पना शहरातील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात नोकरीवर असलेल्या डॉ.संगीता डोंगरे यांना सुचली. त्यांनी या विषयावर डॉ. प्रकाश वानखेडकर (नाशिक), डॉ. शेख हासीम मोहमंद इसाक (धुळे), डॉ. युसुफ इब्राहिम पटेल (जळगाव), डॉ. प्रशांत बागूल (धुळे) यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली. गेल्या चार वर्षांपासून ही संपूर्ण टीम या संशोधनासाठी रात्रंदिवस एक करून काम करत आहेत. या संपूर्ण टीमच्या मदतीने ‘इन्सुलिन इंजेक्टिग डिव्हाईसचा’ चा शोध लावला आहे. या डिव्हईसला नुकतेच ऑस्ट्रेलियातील पेटंट देखील मिळालंय. डॉक्टर डोंगरे यांच्या  टीमने तयार केलेलेले डिव्हाईस रुग्णांच्या दंडावर किंवा मांडीवर लावता येऊ शकते. या डिव्हाईसच्या मदतीनं रुग्णाच्या शरीरातील साखरेचे प्रमाण तपासणी करता येते. तसंच इन्सुलिन किंवा ग्लुकोज डोस देता येतो. त्यामुळे मधुमेही रुग्णांना वारंवार सुई टोचण्याची आवश्यकता नाही अथवा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवणे किंवा कमी होणे याचा त्रास देखील होणार नाही.

    News18लोकमत
    News18लोकमत

    काय आहे किंमत? या डिव्हाईस निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलीय. लवकरच हे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. सर्वसामान्यांना याची खरेदी करता यावी यासाठी याची किंमत 1 हजारापर्यंत असावी असा आमचा प्रयत्न आहे, असे डॉ. डोंगरे यांनी स्पष्ट केले. हे 10 संकेत सांगतात तुमचा मधुमेह पोहोचलाय घातक पातळीवर! मधुमेह हा आजार देशभरामध्ये वाढत असल्यामुळे यावरती काम करावं असं माझ्या डोक्यात आला आणि त्यामुळेच आम्ही कामाला सुरुवात केली या कामात आम्हाला यश मिळाला आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशाचं पेटंट मिळालं. आमच्या या प्रयत्नामुळे मधुमेह रुग्णांच्या चेहऱ्यावरती आनंद येईल, याचा आम्हाला अभिमान आहे, अशी भावना डॉ. डोंगरे यांनी व्यक्त केली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात