जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / खैरेंना त्यांच्या पक्षात किंमत आहे का?, 'त्या' वक्तव्यावरून संदीपान भूमरेंचा खोचक टोला

खैरेंना त्यांच्या पक्षात किंमत आहे का?, 'त्या' वक्तव्यावरून संदीपान भूमरेंचा खोचक टोला

खैरेंना त्यांच्या पक्षात किंमत आहे का?, 'त्या' वक्तव्यावरून संदीपान भूमरेंचा खोचक टोला

संदीपान भूमरे यांनी पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांना खोचक टोला लगावला आहे. खैरे यांना त्यांच्या पक्षात किती किंमत आहे हे सर्वांनाच माहिती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

औरंगाबाद, 14 जानेवारी :  ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होत असल्याचं वक्तव्य केलं होतं. आता चंद्रकांत खैरे यांच्या या वक्तव्यावरून शिंदे गटाचे मंत्री संदीपान भूमरे यांनी खैरे यांना जोरदार टोला लगावला आहे. खैरेंचे त्यांच्या पक्षात काय हाल सुरू आहेत हे आधी त्यांनी बघावं, खैरेंना त्यांच्या पक्षात किती किंमत होती हे सर्वांना माहिती आहे, असं संदीपान भूमरे यांनी म्हटलं आहे. संदीपान भूमरे यांनी नेमकं काय म्हटलं?  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होत असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांना जोरदार टोला लगावला आहे.  खैरेंचे त्यांच्या पक्षात काय हाल सुरू आहेत हे आधी त्यांनी बघावं, खैरेंना त्यांच्या पक्षात किती किंमत होती हे सर्वांना माहिती आहे. आम्ही बंड केल्यामुळेच चंद्रकांत खैरे यांना पक्षात अच्छे दिन आले असं संदीपान भूमरे यांनी म्हटलं आहे. आता यावर चंद्रकांत खैरे काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. हेही वाचा :  या गोंधळाला जबाबदार कोण? तांबेंच्या खेळीमुळे शिवसेना महाविकास आघाडीवर नाराज चंद्रकांत खैरे यांनी काय म्हटलं?  पंकजा मुंडे यांना ठाकरे गटात येण्याची ऑफरच चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. भाजपमध्ये पकंजा मुंडे यांच्यावर अन्याय होत आहे. मुंडेंमुळेच भाजप वाढला. भाजपमध्ये बरेच राजकारण चालते मात्र मी त्यावर बोलणार नाही. पंकजा मुंडे यांच्यासाठी मातोश्रीचा दरवाजा कधीही उघडा आहे, हे खुद्द उद्धव ठाकरे यांनीच सांगितल्याचं खैरे यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात