मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Women's Day 2023 : लग्नानंतर केली शून्यातून सुरूवात, आता आहे कोट्यवधीची मालकीण! Video

Women's Day 2023 : लग्नानंतर केली शून्यातून सुरूवात, आता आहे कोट्यवधीची मालकीण! Video

X
Women's

Women's Day 2023 : छत्रपती संभाजी नगरमधील महिलेनं लग्नानंतर आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केला. आता त्या कोट्यधीश झाल्या आहेत.

Women's Day 2023 : छत्रपती संभाजी नगरमधील महिलेनं लग्नानंतर आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केला. आता त्या कोट्यधीश झाल्या आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

    सुशील राऊत, प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर, 7 मार्च :  उचशिक्षण घेऊन नोकरी करण्याची अनेक महिला आणि तरुणींची इच्छा असते.  छत्रपती संभाजी नगरमधील महिलेची देखील अशीच इच्छा होती. त्यांच्या या अपूर्ण स्वप्नांना पतीनं बळ दिलं. पतीच्या मदतीनं त्यांना नव्या संधीचं आकाश खुलं झालं. आता त्या चार कंपन्यांच्या मालकीन असून त्याची उलाढाल काही कोटींमध्ये आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या उद्योजिकेच्या कार्याचा आढावा घेऊ या.

    औरंगाबाद शहरातील वाळूज भागातील कल्पना अशोक काळे असे यशस्वी उद्योजिकेच नाव आहे. त्या मूळच्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील आहेत. साधारण कुटुंबातील कल्पना (शामला) यांच्या वडीलांचे किराणा दुकान तर आई गृहिणी होत्या. त्यांना एक भाऊ एक बहीण असा त्यांचा परिवार होता. कल्पना घरामध्ये सर्वात मोठे होत्या. त्यावेळी आर्थिक आणि सामाजिक स्थिती शिक्षणाबद्दल प्रतिकूल होती. 12 वी नंतर कल्पना यांचा वैद्यकीय महाविद्यालयात नंबर लागला. त्यावेळी मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवण्याबाबत बरेच गैरसमज होते. त्यामुळे कल्पना यांना वैद्यकीय शिक्षण घेता आलं नाही.

    लग्नानंतर सोडला नोकरीचा विचार...

    शामला यांनी घरातील वडीलधाऱ्यांची समजूत घातली आणि बीएससी इलेक्ट्रोनिकमध्ये पदवीपर्यंतच शिक्षण घेतले. शिक्षणानंतर कल्पना यांचे औरंगाबाद शहरातील इंजिनियर अशोक काळे यांच्याशी लग्न झालं. शिक्षण घेऊन नोकरी करायचं कल्पना यांच स्वप्न होतं मात्र, लग्न झाल्याने त्यांनी नोकरीला विचार सोडला होता.

    स्वप्नपूर्तीसाठी नोकरी सोडली, नातेवाईकांचे टोमणे खाल्ले पण आज सर्वजण करतात सलाम! Video

    मेकॅनिकल इंजिनिअर अशोक काळे हे मूळचे अंबाजोगाईतील आडस या गावचे. मात्र, शिक्षणासाठी त्यांचे कुटुंब औरंगाबाद शहरात स्थायिक झाले. कल्पना यांचे लग्न झाल्यानंतर अशोक काळे हे एका कंपनीमध्ये नोकरीला होते. दरम्यान लग्नानंतर त्यांनी स्वतःच स्टार्टअप करण्याचं निर्णय घेतला. स्वतःचा Clad metal india pvt. Ltd. हा व्यवसाय सुरू केला हळूहळू व्यवसाय वाढत गेला.

    पतीच्या पाठबळाने सुरू केली नोकरी

    व्यवसाय वाढल्याने अशोक यांच्यावर कामाचा भार वाढला. कल्पना यांचे शिक्षण झालेले होते त्यामुळे घरच्या लोकांनी कल्पना यांना अशोकच्या व्यवसायात मदत करण्यास सांगितले. 1998 साली त्यांनी पतीच्या कंपनीमध्ये एक कर्मचारी म्हणून नोकरी जॉईन केली. त्यावेळी कंपनीचा टर्न ओव्हर 50 लाख आणि 70 कर्मचारी कामाला होते. त्यांचे शिक्षण बीएससी मध्ये आणि कंपनी मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे शिक्षणाचा आणि कामाचा ताळमेळ लागत नव्हता. मात्र, नोकरी करण्याची जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कल्पना यांनी कर्मचाऱ्यांसोबत बसून स्वतः सर्व बारकावे समजून घेतले. आज कंपनीचे सर्व काम कल्पना यांच्या देखरेखीमध्ये होते.

    जिद्दीला सलाम! 10 वर्ष वेश्या व्यवसायात सोसले हाल, हिमतीनं बाहेर पडत उभारलं नवं आयुष्य, Video

    500 कोटींचा टर्न ओव्हर

    कल्पना यांच्या कंपनीमध्ये फ्रीजचे सर्व पार्ट बनतात. फ्रीजमध्ये असलेला आईस बॉक्स देखील येथे तयार होता. शामला यांच्याकडे आता 500 कर्मचारी असून कंपनीचा टर्न ओव्हर 500 करोड रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भविष्यात हा टर्न ओव्हर 100 करोड होईल, असा विश्वास कल्पना काळे यांचा आहे.

    महिलांची अनेक स्वप्न असतात. त्यांच्यामध्ये ती पूर्ण करण्याची इच्छाशक्ती देखील असते. मात्र, अनेक वेळा परिस्थितीमुळे त्यांना करणे शक्य होत नाही. मात्र आपल्याकडे अनेक संधी येत असतात. त्या संधीचे सोने करून घेतलं तर आपण नक्की यशस्वी होऊ शकतो. महिलांनी अपयशाला खचून न जाता मिळेल त्या संधीचा सोनं करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे कल्पना सांगतात.

    प्रोत्साहनाची गरज

    गृहिणींमध्ये घर चालवण्यासोबतच शिक्षणानुसार कौशल्य असतात. मात्र, कुटुंबातील व्यक्तींनी जर त्या कौशल्याला प्रोत्साहन दिलं तर महिला देखील पुरुषांप्रमाणे समाजामध्ये स्वतःचा अस्तित्व निर्माण करू शकतात. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने महिलांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे कल्पना काळे यांनी स्पष्ट केले.

    First published:

    Tags: Aurangabad, Chhatrapati Sambhaji Nagar, International Women's Day, Local18