सुशील राऊत, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर 6 मार्च: शिक्षण, शिक्षणानंतर नोकरी आणि नोकरीनंतर चांगल्या पगाराची स्थिर नोकरी लाभली की अनेकांना नवं करण्याचं धाडस होत नाही. पण, छत्रपती संभाजी नगरच्या आरती पारगावकर त्याला अपवाद आहेत. आरती यांनी महाविद्यालयातील प्राध्यापिकेची नोकरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोडण्याचा निर्णय घेतला.
मोठ्या पगाराची नोकरी सोडून उद्योग विश्वात नशीब आजमवण्याचा निर्णय आरती यांनी घेतला. त्यांच्या या प्रवासात अनेक अडचणी आल्या. पण, त्यांनी संयमानं त्याचा सामना केला. आता त्यांनी शहरातील उद्योग विश्वात स्वत:चं अस्तित्व निर्माण केलं आहे. आता त्या नोकरीपेक्षा अधिक कमाई तर करतातच त्याचबरोबर त्यांनी इतरांना रोजगार देखील दिलाय. शहरातील वाळूज भागामध्ये राहत असलेल्यायशस्वी उद्योजिका आरती निशांत पारगावकर या. आरती यांनी नोकरी सोडतजेपी पॉलिमर्स अँड सप्लायर्स ही रबर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरु केलेली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचा हा प्रवास कसा होता ते पाहूया
कशी झाली सुरूवात?
आरती यांचं मुळगाव लातूर मात्र वडिलांच्या नोकरीमुळे त्यांना अधिक वेळ हैदराबाद येथे राहावं लागलं. त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण हैदराबादला झाले. त्यानंतर महाविद्यालय शिक्षण शहरामध्ये झालं. त्यानंतर त्यांना एका खाजगी क्लासेसमध्ये नोकरी लागली आणि त्यानंतर नोकरी लागल्यानंतर निशांत पारगावकर यांच्याशी लग्न झालं.
जिद्दीला सलाम! 10 वर्ष वेश्या व्यवसायात सोसले हाल, हिमतीनं बाहेर पडत उभारलं नवं आयुष्य, Video
निशांत पारगावकर हे मेकॅनिकल इंजिनियर होते. त्यामुळे त्यांना नौदलामध्ये नोकरी लागली. याच दरम्यान आरती यांना औरंगाबाद शहरातीलजेएमसी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नोकरी लागली. त्यांना 30 हजार रुपये पगार होता. पण त्यांना स्वतःचं काहीतरी सुरू करायचं होतं.
यावेळी त्यांनी पती निशांत यांना उद्योग सुरू करण्याबाबत विचारणा केली. निशांत यांना देखील स्वतःचा व्यवसाय सुरू करायचे स्वप्न असल्यामुळे त्यांनी आरती यांना तात्काळ होकार दर्शवला दोघांनी मिळून व्यवसाय करायचे ठरवले. दोघांच्या नोकरीमुळे व्यवसाय कोणी सांभाळायचा हा प्रश्न होता. याचं वेळी आरती यांनी नोकरी सोडून व्यवसाय सांभाळण्यासाठी सहमती दर्शवली आणि यामुळे त्यांनी नोकरी सोडून व्यवसाय पूर्णपणे सांभाळायला सुरुवात केली.
निशांत यांना नौदलामध्ये नोकरी असल्यामुळे ते सहा महिने नोकरीवर तर सहा महिने घरी असतात. त्यामुळे पती नोकरीवर असताना कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदारी आरती यांना सांभाळावी लागते. त्या कौटुंबिक जबाबदारी आणि व्यवसाय जबाबदारी सांभाळताना वेळेचं नियोजन करून दोन्ही गोष्टी जबाबदारपणे पार पडतात.सध्या त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर वार्षिक 40 लाखांपर्यंत आहे.
बँकेतील नोकरी सोडली, शेतकरी कन्या मुलींमध्ये राज्यात पहिली, पाहा Video
विरोध केला सहन
आरती यांनी औरंगाबाद शहरातील नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापक पदाची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा व्यवसाय सुरु केल्यानंतर त्यांना नातलगांमधून यासंदर्भात नकारात्मक प्रतिक्रिया आल्या मात्र त्या त्यांच्या निर्णयाबाबत ठाम होत्या आणि त्यांना याबाबत पती निशांत यांनी खंबीरपणे साथ दिली यामुळे त्यांनी व्यवसाय सुरू ठेवला.
आरती यांना प्राध्यापक असताना इंजीनियरिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम होतं. मात्र त्यांनी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना शिक्षणामध्ये काहीच न करू शिकलेल्या कर्मचाऱ्यांसोबत काम करायला घ्यायचं होतं. यामुळे त्यांना कमी शिकलेल्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेताना अनेक वेळा अडचणी आल्या. यादरम्यान त्यांना कुठलीच कौटुंबिक उद्योगाची पार्श्वभूमी नसल्यामुळे त्यांना या क्षेत्रात सर्व काही नवीन होतं तरी देखील त्यांनी सातत्य आणि संयम ठेवल्यामुळे अनुभवातून त्या क्षेत्रातील बारकावे शिकत गेल्या.
देशभर होते विक्री
आरती यांची जेपी पॉलिमर्स अँड सप्लायर्स कंपनी आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये लागणाऱ्या रबरमॅन्युफॅक्चरिंगकरण्याचे काम कंपनी करते. यासाठी त्यांच्याकडे दहा कर्मचारी कामाला आहेत. त्यांच्या उत्पादनाची शहरातील बडवे इंजीनियरिंग, मायलन, ओखार्ड, अजंता फार्मा, अक्षय फ्लेक्स हाऊस यासह नाशिक इंदोर येथे कंपनीतील उत्पादनाचा पुरवठा केला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chhatrapati Sambhaji Nagar, International Women's Day, Local18, Success story, Womens Day 2023