मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मोठी बातमी : सुभाष देसाईंवर एक हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

मोठी बातमी : सुभाष देसाईंवर एक हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार इम्तियाज जलील यांनी ठाकरे गटाचे नेते माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

औरंगाबाद, 28 डिसेंबर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार इम्तियाज जलील यांनी ठाकरे गटाचे नेते माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सुभाष देसाई यांनी तब्बल एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. लॅंड कंजर्वेशन प्रकल्पामध्ये जाताजाता त्यांनी घोटाळा केल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. जलील यांच्या या आरोपामुळे राजकीय वतृळात खळबळ उडाली आहे.

जलील यांचा नेमका आरोप काय? 

इम्तियाज जलील यांनी सुभाष देसाई यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.  सुभाष देसाई यांनी तब्बल एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. लॅंड कंजर्वेशन प्रकल्पामध्ये हा घोटाळा झाल्याचा दावा जलील यांनी केला आहे. सुभाष देसाई यांनी अधिकाऱ्यांना डावलून जमिनीचे व्यवहार केले. औरंगाबादमध्ये 60 लॅंड कंजर्वेशनसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयाप्रमाणे पैसे ठरले होते. राज्यातील 32 हजार हेक्टर  लॅंड कंजर्वेशन संशयास्पद आहेत. असा गंभीर आरोप जलील यांनी देसाईंवर केला आहे. देसाई यांनी उद्योगमंत्री म्हणून उद्योग तर आणलेच नाहीत मात्र जाताजाता ते पैसे कमवून गेले असा टोलाही जलील यांनी सुभाष देसाई यांना लगावला आहे.

First published:

Tags: Subhash desai