दौलताबाद, 10 डिसेंबर: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील दौलताबाद येथील रहिवासी असणाऱ्या एका तरुणानं पत्नीसोबत वाद (Husband hassle with wife) झाल्यानंतर आपल्या आयुष्याचा हृदयद्रावक शेवट केला आहे. संबंधित तरुणानं दौलताबाद येथील मोमबत्ता तलावात उडी घेत आपलं जीवन संपवलं (Husband jump into lake and suicide) आहे. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
शेख इस्माईल असं आत्महत्या करणाऱ्या 41 वर्षीय तरुणाचं नाव आहे. दौलताबाद याठिकाणी ते आपल्या पत्नी आणि मुलांसोबत राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्माईलचं आपल्या पत्नीसोबत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणातून वाद व्हायचा. गुरुवारी देखील दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. पत्नीसोबत वाद झाल्यानंतर, रागाच्या भरात इस्माईल आपली दुचाकी घेऊन घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते दौलताबाद येथील मोमबत्ता तलावाजवळ जाऊन बराच वेळ बसले.
हेही वाचा-Nagpur:आईला मारहाण करणाऱ्या तरुणाला नियतीनं दिली शिक्षा; पोलीस ठाण्यातच झाला अंत
त्यानंतर त्यांनी पायातील चप्पल, दुचाकीची चावी आणि मोबाइल तलावाच्या काठावर ठेऊन पाण्यात उडी मारली आहे. दुसरीकडे इस्माईल रागाने घराबाहेर पडल्याची माहिती काही गावकऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे ते शोधाशोध करत होता. दरम्यान मोमबत्ता तलावाजवळ इस्माईल यांची दुचाकी आणि त्याचं काही साहित्य आढळलं. त्यामुळे त्यांनी तलावात उडी घेतली असावी, असा संशय गावकऱ्यांना आला. त्यामुळे त्यांनी तलावात उडी घेऊन इस्माईल यांचा शोध घेतला.
हेही वाचा-'तुझे फोटो काढतो', म्हणत विहिरीच्या काठावर केलं उभं; तरुणाला दिला भयंकर मृत्यू
अर्ध्या तासानं इस्माईल यांना पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांना त्वरित घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याना उपचारापूर्वीच मृत घोषित केलं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत इस्माईल यांची दुचाकी आणि काही साहित्य ताब्यात घेतलं आहे. गुरुवारी पत्नीसोबत झालेला वाद विकोपाला गेल्यानेच त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Crime news, Husband suicide