औरंगाबाद, 19 ऑगस्ट: भारतात अनेक वारसा स्थळे आहेत. यापैकीच एक असलेले अत्यंत महत्त्वाचे वारसास्थळ म्हणजे अजिंठा लेणी. ( ajanta caves ) औरंगाबाद ( Aurangabad ) पासून 102 किलोमीटर अंतरावर रमणीय सृष्टीसौंदर्याने नटलेल्या एका प्रचंड नालाकार घळीमध्ये खडकात कोरलेली वाघूर परिसरात अजिंठा लेणी वसलेली आहे. 1983 वर्षी युनोस्को या जागतिक संघटनेने अजिंठा लेणीला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. बौद्ध वास्तू शास्त्र, भिंती चित्रे आणि शिल्पकलेचे आदर्श नमुने म्हणून या लेणी कडे पाहिले जाते. अजिंठा येथे एकूण 30 लेणी असून यामधील 26 व्या लेणी मध्ये प्रसिद्ध पुनर्निर्मित बुद्ध मूर्ती आहे. चला तर मग यामधील 26 व्या लेणी बद्दल जाणून घेऊया. असा लागला अजिंठा लेणीचा शोध अजिंठा लेण्यांचा शोध ब्रिटीश सैन्य अधिकारी मेजर जॉन स्मिथ अजिंठाच्या जंगलात शिकारीसाठी गेले असता त्याला क्रमांक 10 लेणी नजरेस पडली. याचं दिवशी अजिंठा लेणी जगासमोर आली. अजिंठा व्ह्यू पॉइंट येथून त्यांना सर्वप्रथम लेण्या दिसल्या. जॉन स्मिथ यांची सही व वरील दिनांकाचा उल्लेख क्रमांक 10 लेणी मधील एका स्तंभांवर आढळतो. हेही वाचा :
Beed : मुलींवर वाईट नजर टाकाल तर…; दंडुका घेऊन दामिनी पथक सज्ज, VIDEO
अजिंठा लेण्यांमधील वास्तूकला भगवान बुद्धांचे जीवन आणि शिकवण अजिंठा लेण्यांच्या भिंतींवर आणि छतावर कोरीव काम आणि चित्रांद्वारे वर्णन केलेले असून तुम्हाला जुन्या आणि भूतकाळातील लोकांच्या तेजाची आठवण करून देणाऱ्या अजिंठा येथे एकूण 30 लेणी आहेत. अजिंठा लेणीमध्ये 24 बौद्ध विहार आणि 5 हिंदू मंदिरे आहेत. या सर्वांपैकी, लेणी 1, 2, 4, 16, 17 ही सर्वात सुंदर आहे आणि लेणी 26 मध्ये प्रसिद्ध पुनर्निर्मित बुद्ध मूर्ती आहे. गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण 26 क्रमांकाच्या लेणीमध्ये चैत्य आर्ट आहे. 26 क्रमांकाच्या लेणीला डाव्या बाजूला दरवाजा आणि मधल्या बाजूला दरवाजा आहे. मधल्या बाजूचा दरवाज्याने आत मध्ये प्रेवश करता येतो. डाव्या बाजूच्या दरवाज्याजवळ महापरिनिर्वाण झालेली मूर्ती आहे. उजव्या बाजूच्या दरवाजावरती 27 ओळींमध्ये पाली आणि ब्रह्मश्री भाषेत माहिती देणारा मजकूर लिहिलेला आहे. दरवाजातून आत मध्ये गेल्यानंतर सर्वात मोठी आठ मीटर लांब झोपलेल्या अवस्थेत गौतम बुद्धांची मूर्ती आहे. यामध्ये गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण दाखवण्यात आले आहे. यामुळे गौतम बुद्धांच्या मूर्ती खालील असलेले लोक नाराज झालेले रडताना वगैरे दाखवण्यात आलेले आहेत. तर, वरच्या बाजूचे जे लोक आहेत ते हास्य मुद्रित आनंद व्यक्त करताना दाखवलेले आहेत. कारण की गौतम बुद्धांची आत्मा पाया पडून वरच्या बाजूला जाताना दाखवण्यात आलेली आहे. त्यानंतर सर्कल मध्ये गौतम बुद्धांच्या वेगवेगळ्या मुर्ती आहेत त्यातील काही मूर्ती या अर्धवट बनवलेल्या अवस्थेत आहेत. त्याकाळी राजांनी पैसे दिले नसल्यामुळे त्या अर्धवट असल्याचं गाईड विशाल शिंदे हे सांगतात. हेही वाचा :
Pune: क्रांतीकारकांच्या वाड्याचा जीर्णोद्धार, 139 वर्षांपूर्वीचा इतिहास पुन्हा जिंवत, VIDEO भारतीय प्रगत शिल्पकलेची साक्ष अजिंठा लेणीमध्ये पाहायला मिळते. या लेण्यांचे सौंदर्य, स्थापत्य आणि ऐतिहासिक वारसा हा पर्यटकांसोबतच अभ्यासकांनाही नेहमी भूरळ घालतो. त्यामुळे इथं नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पर्यटनातील मानाचे पान असलेल्या अजिंठा लेणी प्रत्येकानं किमान एकदा तरी पाहयला हव्यात.
गुगल मॅपवरून साभार
कसं जाणार? औरंगाबाद शहरापासून 102 किलोमीटर अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी ही लेणी आहे. तुम्ही पुण्यातून येणार असाल, तर 334 किलोमीटर अंतरावर असून 7 तास 47 मिनिटांचा प्रवास करावा लागतो. मुंबईवरून येणार असाल तर 432 किलोमीटर अंतर असून साधारण 8 तास 50 मिनिटांचा प्रवास करावा लागतो. अजिंठा लेणी बघण्यासाठी 40 रुपये तिकीट असून सकाळी 9 ते 5 वेळेस तुम्ही भेट देऊ शकतात.