अविनाश कानडजे (औरंगाबाद) औरंगाबाद, 18 नोव्हेंबर : रस्ते अपघात दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. देशात रस्ते अपघातामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या गंभीर आहे. अपघात कमी करण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी पाऊलं उचलली जात आहेत. मात्र, त्यानंतरही अपघात कमी होताना दिसत आहे. असाच एक धक्कादायक अपघात गंगापूर रोडवरील कायगावजवळ घडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात चार जण जागीच ठार झाल्याची प्रधमिक माहिती मिळाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर रोडवरील कायगाव जवळ दोन कारचा भीषण अपघात #accident #Aurangabad pic.twitter.com/RSRlbPAwb3
— News18Lokmat (@News18lokmat) November 18, 2022
अपघातामध्ये दोन्हीही कारचा चुराडा औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर रोडवरील कायगाव जवळ दोन कारचा भीषण अपघात झाला. स्विफ्ट आणि वॅग्नर कार एकमेकांना धडकल्याने झालेल्या अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाल्याची प्रधमिक माहिती मिळाली आहे. हा अपघात एव्हढा भीषण होता की दोन्हीही कारचा चुराडा झाला आहे. अपघातातील स्विफ्ट कार औरंगाबादमधील बजाज नगर येथील तर वॅग्नर कार अमरावती येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातानंतर मृत आणि जखमींना गंगापूर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. प्रत्यक्षदर्शी कडून मिळालेल्या माहितीनुसार, नगर औरंगाबाद महामार्गावरील नवीन कायगाव येथे रात्री साडेनऊ दरम्यान एका स्विफ्ट कारमधून काही लोक नगरकडून औरंगाबादकडे जात होते. त्यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने कार डिव्हायडर चढून विरुद्ध दिशेला जाऊन औरंगाबादहुन नगरकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वॅगनार कारवर आदळली. या अपघातात बजाज नगर येथील स्विफ्ट कार मधील चार जणांचा जागेवर मृत्यू झाला. यामध्ये रावसाहेब मोटे सुधीर पाटील, महानगर रतन बेडवाल यांच्यासह एकाचा समावेश आहे. तर दुसऱ्या गाडीतील शशीकला कोरट, सिध्दांत जंगले, छाया हेमंत जंगले आणि शकुंतला जंगले राहणार अमरावती हे गंभीर जखमी झाले जखमींना नेवासा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. तर मृत झालेल्या चार जणांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.