जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / समृद्धी महामार्गावर गाडी थांबवून गोळीबार खरा की खोटा? तरुणाच्या माहितीमुळे पोलीसही चक्रावले

समृद्धी महामार्गावर गाडी थांबवून गोळीबार खरा की खोटा? तरुणाच्या माहितीमुळे पोलीसही चक्रावले

समृद्धी महामार्गावर गाडी थांबवून गोळीबार खरा की खोटा? तरुणाच्या माहितीमुळे पोलीसही चक्रावले

समृद्धी महामार्गावर हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

औरंगाबाद, 21 डिसेंबर :  समृद्धी महामार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये  समृद्धी महामार्गावर हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केलेल्या तरुणाला ताब्यात घेतलं होतं. बाळू गायकवाड असं या प्रकरणातील तरुणाचं नाव आहे. मात्र आता या तरुणाच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याने मुलांच्या खेळण्यातील प्लस्टिकची बंदूक वापरून हा व्हिडीओ बनवला असल्याचं समोर आलं आहे. या तरुणाच्या चौकशीनंतर समोर आलेल्या माहितीने पोलिसांना देखील धक्का बसला आहे. तरुणाच्या चौकशीतून धक्कादायक माहिती   घटनेबाबत अधिक माहिती अशी की, समृद्धी महामार्गावर हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात  बाळू गायकवाड नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं होतं. या तरुणाच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याने मुलांच्या खेळण्यातील प्लास्टिकची बंदूक वापरून हा व्हिडीओ तयार केल्याचं समोर आलं आहे. त्याने खेळण्यातील प्लास्टिक बंदुकीचा वापर करून हा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर  या व्हिडीओला स्पेशल इफेक्ट देऊन तो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केल्याचं समोर आलं आहे. हेही वाचा :   लव्ह मॅरेज केलं अन् त्याचं खरं रुप दिसलं, उच्चशिक्षित पत्नीसोबत पतीचं धक्कादायक कृत्य व्हिडीओ ए़डिटर मित्राची चौकशी  ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी या तरुणाच्या व्हिडीओ एडिटर मित्राची देखील कसून चौकशी केली आहे. त्याने व्हिडीओला स्पेशल इफेक्ट दिल्याचं मान्य केलं आहे. तसेच पोलिसांना त्याने मूळ व्हिडीओमध्ये बदल करून, प्रात्यक्षीक देखील करून दाखवले. त्यामुळे आता हा व्हिडीओ बनावट असून, यासाठी प्लॅस्टिकच्या बंदुकीचा वापर केला असल्याचं समोर आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात