मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, केमिकल टँकर पुलावरून कोसळला, चालकाचा जळून कोळसा

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, केमिकल टँकर पुलावरून कोसळला, चालकाचा जळून कोळसा

 केमिकलने भरलेला ट्रक पुलावरून खाली कोसळला. ट्रक कोसळल्यानंतर भीषण आग लागली

केमिकलने भरलेला ट्रक पुलावरून खाली कोसळला. ट्रक कोसळल्यानंतर भीषण आग लागली

केमिकलने भरलेला ट्रक पुलावरून खाली कोसळला. ट्रक कोसळल्यानंतर भीषण आग लागली

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India

अविनाश कानडजे, प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर, 04 मार्च : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून गाजावाजा केलेल्या समृद्धी महामार्गावर 2 भीषण अपघात झाले आहे. केमिकलने भरलेला ट्रक पुलावरून कोसळला आहे. या अपघातात ट्रकमधील सर्व जणांचा मृत्यू झाला आहे. तर नागपूरजवळ पिकअप व्हॅनला अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फतियाबाद परिसरातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. केमिकलने भरलेला ट्रक पुलावरून खाली कोसळला. ट्रक कोसळल्यानंतर ट्रकला भीषण आग लागली आहे. या आगीत केमिकलचा ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहेय ट्रकमधील ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ट्रकमध्ये किती जण होते, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

केमिकल ट्रक असल्यामुळे आग विझवण्यात अग्निशमन दलाला अपयश आले. ट्रक अपघातात नेमका किती जणांचा मृत्यू झाला याचा आकडा अस्पष्ट झाला नाही.

तर नागपूरजवळ एका पिकअप व्हॅनला अपघात झाला आहे. सोलापूर येथून द्राक्षे भरून गोंदियाला जाणारी पिकअप व्हॅन आज पहाटे पाच वाजता समृद्धी महामार्गावरून खाली उतरताना झिरो पॉईंट गार्डनमध्ये घुसली. त्यात गाडीत बसलेल्या गाडी मालकाला इजा झाली तर चालकाला सुद्धा किरकोळ जखमा झाल्या. माणिक रोडगे असे जखमी गाडीमालकाचे नाव आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वेंगुर्ल्यातील निवती समुद्रात बोटीला आग

दरम्यान, वेंगुर्ल्यातील निवती समुद्रात नांगरून ठेवलेल्या मिनी पर्ससीन बोटीला आग लावल्याची घटना घडली आहे. मत्स्य व्यावसायिक श्याम चंद्रकांत सारंग यांच्या मालकीच्या चांदणी या मिनी पर्ससीन बोटीला समुद्रात आग लावण्यात आली. यामधे ३५ लाखांचे नुकसान झाले आहे. यात बोटीवरील तीन इंजिन, जाळी जळून खाक झाली. याबाबत नीवती पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी दिपेश संजय धुरी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने आपण हे कृत्य व्यावसायिक वादातून केले असल्याची कबुली दिली आहे.

First published:
top videos