औरंगाबाद, 9 डिसेंबर : जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांकडे सरकार कायम दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दीपक अंकलखोपे यांनी कलाकृतींतून मांडले आहे. औरंगाबाद शहरातील यशवंत कला महाविद्यालयात 12 डिसेंबर पर्यंत शेतांबरी चित्रकलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील बेडग गावच्या दीपक अंकलखोपे यांच्या कलाकृतीं मांडण्यात आल्या आहेत.
काय आहे शेतांबरी?
दीपक हे एका खेड्यागावांमध्ये लहानाचे मोठे झाले आणि त्यांनी लहानपणापासूनचं शेतकऱ्यांचा संघर्ष जवळून बघितलेला आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर आपण आपल्या कलेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांवरती भाष्य करावं असं त्यांच्या डोक्यात आलं आणि त्यांनी शेतांबरी नावाचे एक मॉडेल तयार केले आहे. या मध्ये त्यांनी शेतकऱ्यांचं पीक राखण्यासाठी उभा असलेला बुजगावणे त्यांनी या मॉडेलमध्ये प्रतिकात्मक शेतकरी म्हणून वापरले आहे. ताठ मानेने उभे राहणारे बुजगावणे या मॉडेलमध्ये खाली कोसळलेले आहे आणि त्याचे डोकं जमिनीवर पडलेले आहे. त्याच वेळेला फाशीचा दोर लागलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्याच्या आजूबाजूला असलेला समाज म्हणून कावळा दाखवण्यात आला आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्याचे राजकारणी, व्यापारी, सरकार लचके तोडतात त्याचप्रमाणे हे कावळे दाखवण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांनो, उंदराच्या भीतीनं 'ही' चूक कधीही करू नका, उत्पादनावर होईल परिणाम! Video
गेल्या सहा-सात वर्षांमध्ये ही संकल्पना सुचली आणि तेव्हापासून यासाठी साहित्य जमा करायला सुरुवात केली. हे मॉडेल तयार करण्यासाठी खर्च आला तो 60 हजार रुपये आणि यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. त्यावेळेस माझ्या आईने घरातील म्हैस विकून मला पैसे दिले आणि त्यातून मी हे प्रदर्शन भरू शकलो. घरातील सदस्याप्रमाणे असलेले जनावर म्हणजे म्हैस ते विकून माझ्या प्रदर्शनासाठी आईने पैसे दिले त्यावेळेस खूप वाईट वाटलं, असं दीपक अंकलखोपे यांनी सांगितलं.
कुठे पाहता येईल प्रदर्शन?
औरंगाबाद शहरातील गजानन मंदिर परिसरात असलेल्या रुग्णालयाच्या पाठीमागे यशवंत कला महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये तुम्हाला हे प्रदर्शन पाहता येईल.
मो.नो+91 95033 58044, 9890018188,
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Local18