जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कौतुकास्पद! विशेष मुलांनी दिवाळीत केली 6 लाखांची उलाढाल, VIDEO

कौतुकास्पद! विशेष मुलांनी दिवाळीत केली 6 लाखांची उलाढाल, VIDEO

कौतुकास्पद! विशेष मुलांनी दिवाळीत केली 6 लाखांची उलाढाल, VIDEO

औरंगाबाद शहरातील आरंभ संस्थेच्या माध्यमातून विशेष मुलांनी दिवाळीनिम्मित लागणाऱ्या विविध 25 प्रकारच्या सजावटीच्या साहित्याची निर्मिती करत तब्बल 6 लाखांची उलाढाल केली.

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

    औरंगाबाद, 27 ऑक्टोबर : मुलांना उद्योजकतेची चालना मिळावी यासाठी औरंगाबाद शहरातील आरंभच्या ऑटिझम अँड स्लो लर्नर येथे दिवाळीनिम्मित लागणाऱ्या सजावटीच्या विविध साहित्याची निर्मिती केली जाते. यावर्षी ही आरंभ संस्थेच्या माध्यमातून विशेष मुलांनी दिवाळीनिम्मित लागणाऱ्या विविध 25 प्रकारच्या सजावटीच्या साहित्याची निर्मिती करत तब्बल 6 लाखांची उलाढाल केली. त्यांनी तयार केलेल्या या साहित्याला मुंबई पुण्यातच नव्हे तर विदेशातही मागणी होती. जन्मताच स्वमग्नता (ऑटिझम) वाट्याला आलेली असताना स्वावलंबी बनण्यासाठी स्वतःच्या आयुष्यातील अडचणींवर मात करत सुदृढ माणसालाही लाजवेल असं काम या मुलांनी केलं आहे. विशेष मुलांसाठी काम करणारी आरंभ संस्था मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवते. यावर्षी ही वर्षभरात विविध प्रकारचे सजावटीचे  साहित्य तयार करून ते विक्री केले गेले आहे. आरंभ संस्थेतील 18 मुलांनी गेल्या वर्षभरामध्ये विविध प्रकारचे 25 साहित्य तयार केले. यात सिद्धेश रेवणाकर, किरण जोशी, श्रीहरी टाकळकर, साद शेख, अस्था क्षत्रिय, साक्षी लोया, प्रसाद गायके इत्यादी मुलांचा समावेश होता. हेही वाचा :  Video : मूर्ती लहान किर्ती महान! बारावीतील मुलीची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद तयार केलेलं साहित्य यावर्षी मुलांनी तयार केलेल्या साहित्यामध्ये 400 तोरण,  400 कंदील , 500 साबण, 200 लटकन, 350 हत्ती, 300 कमळ, 200 अक्षवंताची सुपारी, बुके, फ्लोटिंग कॅण्डल्स, बाहुली, शुभलाभ लटकणे, डेकोरेशन कंदील इत्यादी साहित्य विद्यार्थ्यांनी तयार केलं. मुलांना लहानपणापासूनच स्वमग्नता असल्यामुळे त्यांना शिकवणं हे सर्वात मोठा आव्हान होतं. यामध्ये त्यांची भाषा येणं गरजेचं असतं.  मात्र असं असलं तरी आमचा उद्देश त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचा होता. यामुळे अनेक अडचणी त्यांना समजावून सांगण्यात आल्या मोठ्या प्रमाणात वेळ गेला. मात्र, असं असलं तरी त्यांना समजल्यानंतर त्यांनी हे साहित्य सहज तयार केले, असं आरंभ संस्थेच्या अंबिका टाकळकर यांनी सांगितले. हेही वाचा :  महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या मुलीची गरूडझेप, कॅनडाच्या युनिव्हर्सिटीत करतेय नॅनोकंपोझिटवर संशोधन! इतर दिवाळीच्या तुलनेत यंदाची दिवाळी आम्हाला चांगली गेली. आरंभ संस्थेने शिकवलेल्या विविध वस्तू आम्ही तयार केल्या आणि त्यातून उत्पन्नही मिळालं. यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. पुढच्या वर्षी यापेक्षाही अधिकचे उत्पन्न मिळवण्याची आमची इच्छा आहे, असं सहभागी सिद्धेश रेवणाकर याने सांगितले. वर्षभरामध्ये 18 मुलांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून साहित्य तयार करून घेतलं.  सुरुवातीला साहित्याला फक्त शहरात मागणी होती. मात्र, हळूहळू मुंबई पुणे नागपूर नाशिक यासारखे शहरांमध्ये मागणी वाढत गेली.  विदेशातही आरंभ संस्थेच्या मुलांनी केलेल्या साहित्याला मागणी होती, असंही टाकळकर यांनी सांगितले.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात