जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO: औरंगाबादजवळ संपूर्ण मालगाडी रुळावरुन घसरली; वाहतूक विस्कळीत झाल्याने सणासुदीच्या दिवशी प्रवाशांचे हाल

VIDEO: औरंगाबादजवळ संपूर्ण मालगाडी रुळावरुन घसरली; वाहतूक विस्कळीत झाल्याने सणासुदीच्या दिवशी प्रवाशांचे हाल

VIDEO: औरंगाबादजवळ संपूर्ण मालगाडी रुळावरुन घसरली; वाहतूक विस्कळीत झाल्याने सणासुदीच्या दिवशी प्रवाशांचे हाल

या घटनेमुळे पुढील 10 तास मुंबईकडे ट्रेन जाणार नाही. या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांना गुढीपाडव्याच्या दिवशी त्रास सहन करावा लागणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

औरंगाबाद 02 एप्रिल : औरंगाबादच्या दौलताबाद रेल्वे स्टेशन परिसरात एक मालवाहतूक करणारी रेल्वे रूळावरून घसरल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत एका रुळावरून थेट दुसऱ्या रुळावर अशा अवस्थेत हे रॅक घसरले (Goods Train Derailed near Aurangabad). याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही होत आहे. ऐनवेळी प्लॅस्टिकचा कागद फाटला अन् तिघेही अडकले मृत्यूच्या जबड्यात, औरंगाबादेत शाळकरी मित्रांचा दुर्दैवी अंत या घटनेमुळे पुढील 10 तास मुंबईकडे ट्रेन जाणार नाही. या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांना गुढीपाडव्याच्या दिवशी त्रास सहन करावा लागणार आहे. वीज कापल्याने भाजप आमदाराचा संताप, महावितरण कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत आयकर विभागाची धाड टाकण्याची धमकी, Audio Clip Viral या घटनेमुळे नांदेड- मुंबई रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झालेली आहे. रेल्वे गाड्यांची वाहतूक बंद पडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

जाहिरात

या घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद रेल्वे स्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे, अशोक निकम यांच्यासह रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मालवाहतूक रेल्वे रुळावरुन हटवून वाहतूक सुरळित करण्यासाठी पूर्णावरून ब्रेक डाऊन व्हॅन मागवण्यात आलेली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात