अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 6 मार्च : सध्या 12 वीच्या परीक्षा सुरू असून पहिल्या दिवसापासून राज्य शिक्षण मंडळाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. आधी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत उत्तर छापलं गेलं होतं. तर बुलढाणा जिल्ह्यात बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याने शिक्षण यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली. यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रकरण नेमकं काय - कॉपी देण्यावरून परीक्षा केंद्रावर पालक-शिक्षकांमध्ये वाद झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर जिल्हा परिषद शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. मुलांना कॉपी देण्यासाठी आतमध्ये सोडत नसल्याने हा वाद झाला. तसेच इतर पालकांना सोडलं मग आम्हाला का नाही, असा सवाल पालकांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, या धक्कादायक प्रकारानंतर उघडपणे कॉपी सुरु असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगर : कॉपी देण्यावरून परीक्षा केंद्रावर पालक-शिक्षकांमध्ये वाद, मुलांना कॉपी देण्यासाठी आतमध्ये सोडत नसल्याने पालकच संतापले pic.twitter.com/cu5UCmdOxm
— News18Lokmat (@News18lokmat) March 6, 2023
कोरोनानंतर होणाऱ्या या बारावीच्या परीक्षेला विद्यार्थी मोठ्या उमेदीने सामोरे जात होते. मात्र, मधेच आधी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील चुका त्यानंतर गणिताचा पेपर फुटणे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावर आघात करत आहे. फुटलेला पेपर परत होईल का? याबाबत शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असलं तरी मोठ्या संख्येत बारावीच्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार सुरू असल्याने प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत ती प्रतारणा ठरत असल्याची भावना परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून व्यक्त केली जात आहे. 12वी पेपर फुटी प्रकरणात 2 शिक्षकांसह 5 आरोपी अटकेत; WhatsApp ग्रुप तयार करुन.. असा शिजला कट बारावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रशासनाकडून मोठा वाजागाजा करत यंदा बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियानाच्या माध्यमातून राबवले जातील अशा वल्गना करण्यात आल्या. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा उभारायचं राहून गेल्याने बारावीची परीक्षा कॉपीमुक्त होण्याऐवजी कॉपीयुक्त होत असल्याचं सर्रास दिसत आहे.