जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad : फक्त नावालाच स्मार्ट सिटी; 'इथं' बाजारपेठेत गाडी लावायलाही नाही जागा, पाहा VIDEO

Aurangabad : फक्त नावालाच स्मार्ट सिटी; 'इथं' बाजारपेठेत गाडी लावायलाही नाही जागा, पाहा VIDEO

पार्किंग समस्या पैठण गेट

पार्किंग समस्या पैठण गेट

औरंगाबाद शहरातील पैठण गेट मध्ये पार्किंगची सुविधा (pranging problems) उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    औरंगाबाद, 15 जुलै : ऐतिहासिक व पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराची आता ‘स्मार्ट सिटी औरंगाबाद’ (Smart City Aurangabad) म्हणून सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे. मात्र, स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात मुख्य बाजारपेठ असलेल्या पैठण गेट मध्ये पार्किंगची सुविधा (pranging problems) उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पैठण गेट शहरात मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी शहरातील विविध भागातून नागरिक खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमी ट्राफिक (traffic) होत असल्यामुळे याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पार्किंगची सुविधा करून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे होत आहे. औरंगाबाद शहरातील मध्यभागी असलेल्या पैठण गेट भाग आहे. या ठिकाणी कपड्यांची मोठी बाजारपेठ आहे. यामध्ये लहानांपासून मोठ्यांचे सर्व कपडे मिळतात. त्यासोबतच महिलांचे देखील कपडे या ठिकाणी मिळत असतात. यामुळे शहरातील सर्वच भागातील नागरिक या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात. मात्र, या ठिकाणी असलेल्या दुकान चालकांनी स्वतःच्या दुकानातील ग्राहकांसाठी पार्किंगची व्यवस्था करणे बंधनकारक असताना या ठिकाणी त्यांनी तळमजल्यात देखील दुकाने थाटली आहेत. यामुळे दुकान चालकांना पार्किंग करण्यासाठी जागाच उरलेली नाही आणि यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहने रस्त्यावरच उभी करावी लागत आहेत. अरुंद रस्त्यावर वाहने उभी केल्यामुळे या ठिकाणी नेहमी ट्राफिक होत असते. यामुळे नागरिकांना याचा मोठा मनस्ताप होतो.

    Aurangabad : बारावीनंतर ‘हे’ कोर्स करा आणि लगेच व्हा लखपती, मोठ्या कंपनीत मिळणार संधी! VIDEO

    काय सांगतो नियम कोणतही घर किंवा दुकान बांधत असताना संबंधित व्यक्तीने महापालिकेकडून त्याची परवानगी घेणे बंधनकारक आहे. महापालिका यासंबंधी तपासणी करून त्या संबंधित सूचना करत असतात. यामध्ये दुकान चालक व घर मालकाने बांधकाम करताना दुकान किंवा घरासाठी पार्किंगची जागा सोडणे बंधनकारक असते. पार्किंगची जागा न सोडल्यास महापालिका प्रशासन कारवाई देखील करू शकतो. मात्र, या ठिकाणी दुकान चालकांनी पार्किंगसाठी असलेली तळमजले दुकानांनी थाटले आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या दुकान चालकांना पार्किंगची पर्यायी व्यवस्थाच नाहीये. नागरिक काय म्हणतात  “येथील व्यवसायिकांनी मोठ-मोठालीत दुकाने थाटली. मात्र, या दुकानांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली नाहीये. यामुळे या ठिकाणी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठी गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. तरी यासाठी पर्यायी पार्किंगची व्यवस्था व्हावी”, अशी मागणी पप्पू इंगळे यांनी केली आहे. “महानगरपालिका नियमावली ठरवून देत असताना देखील या ठिकाणी नियमावली पाळली जात नाही. परिणामी याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो महापालिकेने सर्वसामान्यांची समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करावी”, अशी मागणी कुणाल तुपे यांनी केली आहे. वाचा : Ashadhi Ekadashi 2022 : आषाढी वारीत विठ्ठलाच्या भक्तीत वारकरी तल्लीन; मात्र टाळ मृदंगाच्या किंमती वाढल्या, पहा VIDEO दरम्यान, औरंगाबाद शहरातील मुख्य बाजारपेठेच्या पार्किंग संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्या फोनवर कॉल केला असता त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल आला यामुळे प्रशासनाची बाजू या प्रकरणी समजू शकली नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात