जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad : बारावीनंतर 'हे' कोर्स करा आणि लगेच व्हा लखपती, मोठ्या कंपनीत मिळणार संधी! VIDEO

Aurangabad : बारावीनंतर 'हे' कोर्स करा आणि लगेच व्हा लखपती, मोठ्या कंपनीत मिळणार संधी! VIDEO

बारावीनंतर हे कोर्स केल्यास लगेच लखपती होण्याची संधी आहे.

बारावीनंतर हे कोर्स केल्यास लगेच लखपती होण्याची संधी आहे.

ऑटोमोबाईल क्षेत्रात (Automobile Industry) निर्माण झालेल्या संधी बघून सर्वात जास्त उत्पन्न मिळविण्याचे क्षेत्र म्हणून या क्षेत्राची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    औरंगाबाद, 14 जुलै :   वाढत चाललेल्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये कुशल कामगारांची मागणी देखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये नोकरीच्या प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रात (Automobile Industry) निर्माण झालेल्या संधी बघून सर्वात जास्त उत्पन्न मिळविण्याचे क्षेत्र म्हणून या क्षेत्राची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. बारावीनंतर तुम्ही या क्षेत्रात करिअर करून चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी एका उपयोगी कोर्सची ओळख आम्ही तुम्हाला करून देणार आहोत. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची मागणी लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे दीनदयाळ उपाध्याय केंद्र अंतर्गत इंडस्ट्रियल ऑटोमेशन व ऑटोमोबाईल (Industrial Automation and Automobiles) त्यासोबतच इंडस्ट्रियल ऑटोमेशन व ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी (Industrial Automation and Automobile Technology) हे दोन कोर्स सुरू करण्यात आले आहेत. कशी आहे प्रवेश प्रक्रिया? या दोन्ही कोर्ससाठी तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर यासाठी  प्रवेश परीक्षा नसून यासाठी फर्स्ट कम फर्स्ट यानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया  31 जुलै पर्यंत सुरू राहणार आहे. बी. व्होक इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि ऑटोमोबाईल हा कोर्स तीन वर्षाचा असून प्रत्येकी  50-50  विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. तर एम. व्होक  इंडस्ट्रिअल ऑटोमेशन आणि ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी हा  कोर्स दोन वर्षाचा असून प्रत्येकी 20-20  विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. कोर्ससाठी फी किती? इंडस्ट्रियल ऑटोमेशन व ऑटोमोबाईल कोर्स साठी फीस ही 14 हजार 500 रुपये असेल तर इंडस्ट्रिअल ऑटोमेशन व ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या कोर्ससाठी 19   हजार 500 रुपये फीस आहे. केवळ दहावी, बारावीवर मिळेल 10 लाखांचे पॅकेज; फक्त ‘हा’ कोर्स करावा लागणार, पहा VIDEO विद्यार्थ्यांना सुविधा काय आहेत? या विभागासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात स्वतंत्र हॉस्टेल आहेत. यासाठी मुलींसाठी व मुलांसाठी वेगवेगळ्या व्यवस्था करण्यात आले आहेत. त्यासोबत विद्यापीठाची लायब्ररी आहे. त्याचा देखील वापर विद्यार्थ्यांना करता येऊ शकतो. विद्यापीठात कॅन्टीनची सुविधा उपलब्ध आहे. विद्यापीठात ये जा करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट बस देखील विद्यार्थ्यांना वापरता येऊ शकतात. तसेच SC /ST प्रवर्गासाठी स्कॉलरशिप सुविधा उपलब्ध आहे. प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रं दहावी आणि बारावी, एम .सी .व्ही. सी (कोणताही विषय ) पास मार्कशीट,रहिवासी प्रमाणपत्र , जात प्रमाणपत्र , कॉलेजचा दाखला सत्यप्रत इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करायचं आहे? मोफत प्रशिक्षण घेऊन सुरू करा तुमचं ड्रीम प्रोफेशन, पाहा VIDEO शिक्षण घेतल्यानंतर जॉबच्या संधी कुठे? यशश्री प्रेस कंपोनंट, व्हेरॉक, प्रेसिएंट ऑटोमेशन, पतंजली नॅक ग्रुप ऑफ इंडस्ट्री ,इलेकट्रोमेट , टाटा मोटर्स,  जैन इरिगेशन ,एच के बेरिंग, इलेक्ट्रोमेट एन्ड्युरन्स, संग्राम ऑटोमोबाईल, संजीव ऑटो, कोलगेट पोल लियोन, एम आर पगारिया ऑटो, सतीश मोटर्स कंपन्यांतर्फे विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली जाते. यामध्ये सुरुवातीचे पॅकेज हे 3 लाखापासून ते 10 लाखांपर्यत मिळते.

                                                                                                                    गुगल मॅप वरून साभार…

    जाहिरात

    कुठे शिकवला जाणार हा कोर्स ? सोनेरी महल जवळ सीएफसी बिल्डिंग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद,  महाराष्ट्र 431004 हा विभागाचा पत्ता आहे. तसेच director.ddukk@bamu.ac.in विभागाचा ई-मेल आयडी यावर संपर्क साधू शकता. https://online.bamu.ac.in/unic/admission-2022/  या वेबसाईटवर देखील अधिक माहिती उपलब्ध आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात