जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / माजी आमदार हर्षवर्धन जाधवांविरोधात गंभीर आरोप; मैत्रिणीच्या Video नंतर राजकीय खळबळ

माजी आमदार हर्षवर्धन जाधवांविरोधात गंभीर आरोप; मैत्रिणीच्या Video नंतर राजकीय खळबळ

माजी आमदार हर्षवर्धन जाधवांविरोधात गुन्हा दाखल

माजी आमदार हर्षवर्धन जाधवांविरोधात गुन्हा दाखल

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात मारहाण केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे (औरंगाबाद) औरंगाबाद, 31 ऑक्टोबर : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महिलेला बेदम मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कन्नड शहर पोलिसात याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांच्या मैत्रीण असलेल्या ईशा झा यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार केली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ ईशा यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

जाहिरात

इशा झा या हर्षवर्धन जाधव यांच्या जवळच्या मैत्रीण आहे, अनेक वर्षापासून ते सोबत राहत होते. ईशा झा यांनी मारहाण केल्याचा आरोप करत त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यानंतर त्यांनी कन्नड शहर पोलीस ठाण्यात मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. ईशा झा यांनी आपल्या व्हिडिओत म्हटले आहे की, आज हर्षवर्धन जाधव यांनी मला बेदम मारहाण केली. माझे केस पकडून जाधव यांनी मला मारहाण केली. त्यामुळे पोलिसात मी तक्रार दाखल केली असून, आता काय होईल याबाबत मला माहित नाही, असे ईशा झा यांनी व्हिडिओत म्हटले आहे. वाचा - 4 वर्षांचं प्रेम, डोळ्यांवर पट्टी बांधून दिलं सरप्राईज; तरुणीचं क्रूर कृत्य! तर पुढे बोलताना त्या म्हणाल्या आहेत की, आता मी कंटाळले आहे, माझ्यावर नेहमी संशय घेतला जातो, माझं नावं प्रत्येकाशी जोडले जातं. घरात असलेल्या एका मुलाशी माझे संबध जोडण्याचा प्रयत्न केला. मला वाटलं होतं की त्यांच्यात बदल होईल. मात्र, तसं झालं नाही. मला खूप मारहाण केली असून, मी कन्नड सोडून जात आहे. त्यामुळे यानंतर मी कधीच कन्नडमध्ये परतणार नसल्याचं देखील ईशा झा यांनी म्हटले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात