मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad : सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी अंधांसाठी केलं मोठं काम, वाचून वाटेल अभिमान

Aurangabad : सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी अंधांसाठी केलं मोठं काम, वाचून वाटेल अभिमान

औरंगाबाद शहरातील शारदा मंदिर कन्या प्रशालेमध्ये सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनींने ब्लाइंड स्टिक तयार केली आहे.

औरंगाबाद शहरातील शारदा मंदिर कन्या प्रशालेमध्ये सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनींने ब्लाइंड स्टिक तयार केली आहे.

औरंगाबाद शहरातील शारदा मंदिर कन्या प्रशालेमध्ये सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनींने ब्लाइंड स्टिक तयार केली आहे.

औरंगाबाद, 21 सप्टेंबर : क्षणभर डोळे मिटून चालण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला चाचपडायला होते. आपल्याला चालता येत नाही. आपण कुठे पडणार तर नाही ना, अशी भीती वाटते; परंतु दृष्टिहिनांसाठी त्यांच्या हातातील काठी हाच दिवा असतो. ही काठी अंधांसाठी मार्गदर्शक ठरावी यासाठीच औरंगाबाद शहरातील शारदा मंदिर कन्या प्रशालेमध्ये सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनींने ब्लाइंड स्टिक तयार केली आहे. औरंगाबाद शहरातील शारदा मंदिर कन्या प्रशालेमध्ये सहावीच्या वर्गात श्रेया चंद्रहास, अद्विका भागवतकर, अनुश्री तायडे, सुप्रभा कानिटकर, केतकी जाधव या शिक्षण घेत आहेत. शिक्षकांनी वेगवेगळे ग्रुप तयार करून विद्यार्थ्यांना नवीन काही तयार करायला सांगितले होते. यामध्ये श्रेया चंद्रहास, अद्विका भागवतकर, अनुश्री तायडे, सुप्रभा कानिटकर, केतकी जाधव या पाच विद्यार्थिनींचा ग्रुप तयार केला होता.  हेही वाचा : शास्त्रज्ञांनी विकसित केली जांभळ्या टोमॅटोची वैशिष्ट्यपूर्ण जात अशी सुचली संकल्पना  श्रेया चंद्रहास या विद्यार्थिनीचे वडील एका शाळेमध्ये शिक्षक आहेत. ज्या शाळेमध्ये अंध व्यक्तींसाठी विशेष वर्ग घेतले जातात. श्रेया सांगते की, एक वेळेस मी वडिलांसोबत शाळेत गेले. त्यावेळेस मला अंध व्यक्तींच्या अडचणी लक्षात आल्या आणि ही गोष्ट लक्षात घेत मी अंध व्यक्तींसाठी ब्लाइंड स्टिक तयार करण्याचं ठरवलं होतं. ही संकल्पना मी मैत्रिणींना आणि शिक्षकांना सांगितली ती सर्वांना आवडली आणि त्यामुळे आम्ही ब्लाइंड स्टिक तयार केली. आम्हाला ब्लाइंड स्टिक तयार करण्यासाठी शिक्षक आणि  पालकांनी मार्गदर्शन केलं. वाढदिवसाचा खर्च टाळून आम्ही ब्लाइंड स्टिक गरजूं अंध व्यक्तींना देणार आहोत. लॅबमधील साहित्याचा वापर ब्लाइंड स्टिक तयार करण्यासाठी लॅबमधील साहित्याचा वापर करण्यात आला आहे. जम्पर सेंसर, बझर, पाईपचा वापर करण्यात आला आहे. दृष्टिहीन व्यक्तीसमोर एखादी अडचण आल्यास त्याला या ब्लाइंड स्टिक माध्यमातून लक्षात येईल आणि ते बझर वाजेल. शाळेतील लॅबमधील साहित्याचा वापर करण्यात आल्यामुळे ही ब्लाइंड स्टिक बनवण्यासाठी विद्यार्थिनींना फक्त 300 रुपये खर्च आला. हेही वाचा : Zoom वर मीटिंग करत असाल तर... सरकारने दिला इशारा, लगेच करा हे काम! 11 ते 14 वयोगटातील मुली या क्रियेटीव्ह असतात. त्यांच्या कल्पना खूप सुंदर असतात. कल्पनांना कृतीत उतरवण्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. मुलींनी आणखी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करावे, असं मार्गदर्शक शिक्षका मंगल दांडगे सांगतात.
First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News

पुढील बातम्या