मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Zoom वर मीटिंग करत असाल तर... सरकारने दिला इशारा, लगेच करा हे काम!

Zoom वर मीटिंग करत असाल तर... सरकारने दिला इशारा, लगेच करा हे काम!

झूम अॅपबाबत सरकारचा इशारा, त्वरित अपडेट करा

झूम अॅपबाबत सरकारचा इशारा, त्वरित अपडेट करा

पूर्वी मीटिंग, लेक्चर आदी गोष्टींसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहायला पर्यायच नव्हता; पण अलीकडच्या काळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या सुविधेमुळे मीटिंग्ज, लेक्चरसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहायला लागतंच असं नाही.

मुंबई, 20 सप्टेंबर : पूर्वी मीटिंग, लेक्चर आदी गोष्टींसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहायला पर्यायच नव्हता; पण अलीकडच्या काळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या सुविधेमुळे मीटिंग्ज, लेक्चरसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहायला लागतंच असं नाही. कोरोना काळात सर्वच गोष्टींवर निर्बंध आले होते. प्रत्यक्ष भेटीगाठी जवळपास बंद झाल्या होत्या. अशा वेळी बहुतांश कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम ही संकल्पना स्वीकारली. महत्त्वाच्या मीटिंग्जसाठी व्हिडिओ कॉन्फरसिंग तंत्राचा वापर वाढला. या कालावधीत झूम हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप  विशेष वापरात आलं. कोरोना काळानंतरही या अ‍ॅपचा वापर आणि लोकप्रियता कमी झालेली नाही. मीटिंग्ज, लेक्चर, गेटटुगेदर आदी बाबींसाठी या अ‍ॅपचा वापर होत आहे. तुम्ही या अ‍ॅपचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी विशेष महत्त्वाची आहे. या अ‍ॅपमध्ये सुरक्षेच्या अनुषंगाने तीन त्रुटी (Error) आढळल्या आहेत. त्यामुळे हे अ‍ॅप तातडीनं अपडेट करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. सायबर सुरक्षाविषयक धोक्यांशी दोन हात करणाऱ्या इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम अर्थात सीईआरटी-इनने दिलेल्या माहितीनुसार, झूममध्ये तीन त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटींमुळे, हॅकर्स मीटिंगमध्ये सहभागी झालेल्यांच्या संपर्कात न येता मीटिंगमध्ये सहभागी होऊ शकतात. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अर्थात MeitY ने हा धोका मध्यम स्वरूपाचा असल्याचं म्हटलं आहे. झूममध्ये तीन त्रुटी आढळल्या आहेत. CVE-2022-28758, CVE -20222028759, CVE-2022-28760 या झूम ऑन प्रिमायसेस मीटिंग कनेक्टर एमएमआरवर परिणाम करतात, असं सरकार आणि झूम यांनी म्हटलं आहे. सरकारने 19 सप्टेंबरला हा मुद्दा उपस्थित केला आहे; पण झूमने त्यापूर्वीच म्हणजे 13 सप्टेंबर रोजी याबाबत युझर्सना इशारा दिला होता. या त्रुटींमुळे हॅकर्स मीटिंग जॉइन करण्यात यशस्वी झाले, तर ते मीटिंगचं व्हिडिओ आणि ऑडिओ फीड (Video And Audio Feed) मिळवू शकतात. तसंच, हॅकर्स व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉल मीटिंगदरम्यान कंपनीने शेअर केलेली संवेदनशील माहिती अ‍ॅक्सेस करू शकतात. मॅक ओएस (Mac OS), विंडोज (Windows) आणि लिनक्स युझर्सनी (Linux Users) झूम डेस्कटॉप क्लायंटमध्ये साइन-इन करून आपल्या प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करावं. त्यानंतर 'चेक फॉर अपडेट'वर टॅप करावं. एखादी नवा व्हर्जन उपलब्ध असेल तर टॅप करताच ती ऑटोमॅटिक डाउनलोड होऊन इन्स्टॉल होईल. अँड्रॉइड युझर्सनी आपल्या फोनमधल्या गुगल प्ले स्टोअरवरून, तर आयफोन युझर्सनी अ‍ॅपल डिव्हाइसमधल्या अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर जाऊन झूमचं लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करावं, असा सल्ला सरकारने युझर्सना दिला आहे.
First published:

पुढील बातम्या