जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिंदे गट अन् भाजप युतीत ठिणगी? सत्तारांच्या ताब्यात असलेल्या नगरपरिषदेविरोधात भाजप आक्रमक

शिंदे गट अन् भाजप युतीत ठिणगी? सत्तारांच्या ताब्यात असलेल्या नगरपरिषदेविरोधात भाजप आक्रमक

शिंदे गट अन् भाजप युतीत ठिणगी?

शिंदे गट अन् भाजप युतीत ठिणगी?

सिल्लोड नगरपरिषदेविरोधात भाजपने बंदची हाक दिली होती. त्याला व्यापाऱ्यांचाही 100 टक्के प्रतिसाद मिळाला.

  • -MIN READ Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे (औरंगाबाद) औरंगाबाद, 13 फेब्रुवारी : शिंदे गटाचे कृषी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात असलेल्या सिल्लोड नगरपरिषदेच्या करवाढी विरोधात भाजपने आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. मागील आठवड्यात भाजपने डफडे वाजवा आंदोलन करत इशारा दिला होता. यानंतर आज पुन्हा भाजपाने सिल्लोड नगरपरिषदेच्या करवाढी विरोधात कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले होते. या बंदला व्यापाऱ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे सिल्लोड शहरात भाजप विरुद्ध सत्तार हा संघर्ष आता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे गट आणि भाजपमध्ये ऑल इज नॉट वेल अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. सिल्लोड नगर परिषदेने प्रस्तावित केलेल्या करवाढी विरोधात भाजपतर्फे 26 जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. प्रस्तावित करवाढ ही चुकीच्या पद्धतीने लावलेली असून ती पूर्णपणे बेकायदेशीर असल्यामुळे हा कर रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात 6 फेब्रुवारी रोजी भाजपतर्फे ढोल बजाव आंदोलन देखील करण्यात आले होते. आंदोलनानंतर देखील नगर परिषद प्रशासनाला जाग आली नाही. त्यामुळे आज भाजपतर्फे सिल्लोड बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला व्यापाऱ्यांचा देखील मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला आहे. वाचा - युतीत नॉट ओके, मुख्यमंत्री शिंदेंच्या खास मंत्र्याच्या मतदारसंघात भाजपकडून कडकडीत बंद करवाढीसाठी शहराचे 4 झोन करण्यात आले असून, सर्वाधिक कर झोन क्रमांक 1 मधील मालमत्तांना लावण्यात आल्याने सामान्य जनतेला वेठीस धरून मालमत्ता करवाढ करण्याचे षडयंत्र आहे. एकदा करवाढ केल्यानंतर पुढील काळात यापेक्षा अधिक कर भरावा लागणार आहे हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे. शासन निर्णयानुसार आणि योग्य पद्धतीने आकारण्यात आलेला कर भरण्यास विरोध नाही. परंतु, चुकीचा मालमत्ता कर आकारणी करून कराच्या माध्यमातून जमा करण्यात येत असलेल्या खंडणीचा विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिल्लोड बंदची हाक देण्यात आली होती.

News18लोकमत
News18लोकमत

राज्यात सत्तेत सोबत असले तरीही सिल्लोडमध्ये भाजप विरुद्ध अब्दुल सत्तार हा वाद काही संपलेला नाही. अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस सोडल्यावर ते भाजपमध्ये येणार होते. यासाठी संपूर्ण तयारी देखील करण्यात आली होती. मात्र, सिल्लोडमधील भाजपच्या नेत्यांनी विरोध केल्याने अब्दुल सत्तार यांचा भाजप प्रवेश होऊ शकला नव्हता. मात्र, आता शिंदे गट आणि भाजप सत्तेत सोबत आहे. तरीही सिल्लोडमधील अब्दुल सत्तार आणि भाजप यांच्यातील एकमेकांना होणारा विरोध कायम आहे. भाजपची आक्रमकता पाहता बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपमध्ये ऑल इज वेल नसून सिल्लोड मधील ही बदलाची नांदी असून, भाजप सिल्लोडची जागा हायजॅक करू पाहतंय का? असा प्रश्न निर्माण होतोय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात