जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad Railway Accident : एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून जाणाऱ्या दोन मित्रांना रेल्वेने उडवले

Aurangabad Railway Accident : एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून जाणाऱ्या दोन मित्रांना रेल्वेने उडवले

ही बस हैदराबादहून लखनऊकडे जात होती. या बसमध्ये 100 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.

ही बस हैदराबादहून लखनऊकडे जात होती. या बसमध्ये 100 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.

रेल्वे रुळाच्या शेजारून एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून गाणे ऐकत चालत जाणाऱ्या दोन युवकांना औरंगाबादहून नांदेडकडे जाणाऱ्या नंदिग्राम एक्सप्रेसने उडवले.

  • -MIN READ Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

औरंगाबाद, 30 सप्टेंबर : नवरात्र उत्सव पाहून घरी येत असताना रेल्वे रुळाच्या शेजारून एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून गाणे ऐकत चालत जाणाऱ्या दोन युवकांना औरंगाबादहून नांदेडकडे जाणाऱ्या नंदिग्राम एक्सप्रेसने उडवले. या घटनेमुळे मुकुंद नगर भागात शोककळा पसरली आह. हे दोन्ही युवक पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत होते. तेजस राहुल जाधव आणि ऋषिकेश सुधाकर जाधव अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जाहिरात

मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्र उत्सव पाहून दोन मित्र खांद्यावर हात टाकून निघाले होते. दरम्यान मार्गावर असणाऱ्या रेल्वे ट्रॅकवरून जात असताना त्यांचा अपघातात मृत्यू झाला. हे दोघे एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून निघाले होते. कानात हेडफोन घातला असल्याने दोघांनाही रेल्वे येत असल्याने समजले नसल्याने रेल्वे ट्रॅकवर असलेले दोघेही चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही अभियांत्रीकीचे शिक्षण घेत होते. तेजस राहुल  जाधव आणि ऋषिकेश सुधाकर जाधव अशी या मुलांची नावे आहेत, दरम्यान घटनेची नोंद मुंकुंदवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हे ही वाचा :  मुलं चोरणारा समजून शेकडो लोकांनी त्याला घेरलं अन्.., ठाण्यातील धक्कादायक घटनेचा Video

नांदेडमध्ये भीषण अपघातात 5 रेल्वे मजुरांचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यातील (Nanded District ) हिमायतनगर येथे झालेल्या भीषण अपघातात तब्बल 4 मजुरांचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ट्रक आणि आयशरची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर पाच जण  हे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात

नांदेड-किनवट राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सोनारीफाटा करंजी जवळ सदर भीषण अपघात घडला आहे. जखमींना हिमायतनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती आहे. रात्री साडे आठच्या सुमारास हा अपघात झाला आहे. दरम्यान, सदर अपघात मृत्युमुखी पडलेले मजूर हे बिहार राज्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.

हे ही वाचा :  धक्कादायक! मुंबईतील हॉटेलमध्ये 30 वर्षीय मॉडेलची आत्महत्या, सुसाईट नोटमधून मोठा खुलासा

जाहिरात

उत्तर प्रदेश आणि बिहारमधून पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक तरुण हे महाराष्ट्रात येत असतात. सदर अपघातात मृत्युमुखी पडलेले हे सर्व तरुण देखील आपले पोट भरण्यासाठी बिहार राज्यातून महाराष्ट्रात आले होते. या पाच तरुण कामगारांवर नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात करंजी फाट्याजवळ काळाने घाला घातला. दिवसभर काम करून रात्री आठच्या सुमारास ते आपल्या निवासस्थानाकडे परत जात होते. यावेळी त्यांच्या आयशर टेम्पोला सिमेंट नेणाऱ्या ट्रकने समोरून धडक दिली.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात