जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / धक्कादायक! मुंबईतील हॉटेलमध्ये 30 वर्षीय मॉडेलची आत्महत्या, समोर आलं धक्कादायक कारण

धक्कादायक! मुंबईतील हॉटेलमध्ये 30 वर्षीय मॉडेलची आत्महत्या, समोर आलं धक्कादायक कारण

संग्रहित फोटो

संग्रहित फोटो

एक धक्कादायक माहिती समोर येत आहे, मुंबईतील अंधेरी भागातील एका हॉटेलच्या खोलीत 30 वर्षीय मॉडेलने आत्महत्या केली आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

वसीम अन्सारी,  मुंबई, 30 सप्टेंबर-   एक धक्कादायक माहिती समोर येत आहे, मुंबईतील अंधेरी भागातील एका हॉटेलच्या खोलीत 30 वर्षीय मॉडेलचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी सुसाईड नोट जप्त केली आहे. तसेच एडीआर अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटसृष्टीत काम न मिळाल्याने मृत मॉडेल नैराश्यात होती असा संशय व्यक्त केला जात आहे. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ही मॉडेल लोखंडवाला येथील यमुना नगर सोसायटीची रहिवासी होती. घटनास्थळी वर्सोवा पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली आहे. यामध्ये लिहलंय, ‘मला माफ करा.. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, मी आनंदी नव्हते. मला फक्त शांती हवी होती’. असं म्हणत या मॉडेलने आपलं आयुष्य संपवलं आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सांगितलं की, या मॉडेलने बुधवारी रात्री हॉटेलमध्ये एक खोली बुक केली होती. तिने हॉटेलच्या खोलीतच आपल्यासाठी जेवण मागवलं होतं. पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

जाहिरात

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मॉडेलने हॉटेलमध्ये चेक इन करुन जेवणाची ऑर्डर दिली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या वेटरने रुमची बेल वाजवली. परंतु अनेकवेळा बेल वाजवूनही या मॉडेलने दार उघडलं नाही. ज्याची माहिती वेटरने हॉटेलच्या मॅनेजरला दिली, मॅनेजरने तात्काळ पोलिसांना फोन करुन माहिती दिली. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर पोलिसांनी मास्टर किच्याआधारे खोलीचा दरवाजा उघडला. आत पाहिलं असता, मॉडेलने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर तात्काळ तिला रुग्णालयात पोहोचवण्यात आलं परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात